World

अखेर फेसबुक चे नाव बदलले..मार्क झुकेनबर्ग यांची मोठी घोषणा..!हे असेल नवे नाव..!

अखेर फेसबुक चे नाव बदलले..मार्क झुकेनबर्ग यांची मोठी घोषणा..!हे असेल नवे नाव..!

जग भरातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी आणि सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक..फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया असून ह्याद्वारे जगभरातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात असतात.गेल्या काही वर्षांपासून फेसबुक चे नाव बदलण्याची चर्चा सुरू होती.अखेर फेसबुक चे संस्थापक मार्क झुकेनबर्ग ने ही घोषणा केली असून फेसबुक आता मेटा (Meta) या नावाने ओळखली जाणार आहे.

कंपनीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्या कार्यरत आहेत. दरम्यान हा बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही परिणाम होणार नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button