Maharashtra

शेवटी…अमळनेर न प चे स्वयंघोषित नगर अभियंता यांचे अधिकार संपुष्टात…जिल्हाधिकारी नेमणार चौकशी समिती…

शेवटी…अमळनेर न प चे स्वयंघोषित नगर अभियंता यांचे अधिकार संपुष्टात…जिल्हाधिकारी नेमणार चौकशी समिती…

अमळनेर नगरपरिषद जिल्हा जळगाव नगर अभियंता बांधकाम विभाग व नगर रचना विभाग संवर्ग सेवा अंतर्गत पदाचा कार्यभार अनियमितपणे नियमबाह्य बेकायदेशिर व भ्रष्टाचार रित्या श्री.संजय पाटील या सब ओव्हरसीयर न.पा.आस्थापनेवरील अस्थायी संवर्ग बाह्य पदाकडे सन २०१७ पासुन आजपर्यंत दिलेबाबत.

अमळनेर येथील श्री.रामकृष्ण भगवान बागुल यांना मा.उप लोकायुक्त यांचेकडे अमळनेर नगरपरिषदेकडील नगर अभियंता व नगररचना या विभागाचा कार्यभार संगर्व बाह्य श्री.संजय पाटीय, सब-ओव्हरसिअर यांचेकडे दिलेबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अहवाल मागविण्यात आला होता. त्याअनुषंगाने शासनाला अहवाल सादर करावयाचा होता.पण सदर अहवाल सादर करण्यात आला नाही.

तसेच उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांनी सदर प्रकरणी चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करणेबाबत मा.प्रादेशिक उपायुक्त यांना कळविले होते. सदर पत्राची प्रत आपणास देखील देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयाव्दारे पुन्हा आपला अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर देखील आपण अहवाल सादर केला नाही.

त्यानंतर उपायुक्त (नपप्र) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी सदर प्रकरणी अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे. वारंवार नमुद विषय प्रकरणी पुन्हा अहवाल सादर करणेबाबत कळवूनही आपण आपला अहवाल सादर केला नाही.

सदर प्रकरणी वारंवार अहवाल मागवूनही आपण अहवाल सादर न करणे ही अत्यंत गंभीर बाब असुन,सदर प्रकरणी आपण शासन तसेच इतर वरीष्ठ कार्यालयाच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात येते. आपल्या नगरपरिषदेमध्ये नगर अभियंता या पदावर अधिकारी कार्यरत असतांना त्यांचे कायदेशिर अधिकार हे बेकायदेशिरपणे
श्री.संजय पाटील सब-ओव्हरसिअर हे संवर्ग बाहय कर्मचारी वापरत असल्याचे निदर्शनास येते. जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणाऱ्या अंदाजपत्रकावर तसेच इतर नकाशांवर नगर अभियंता यांची सही असण्या ऐवजी श्री.संजय पाटील सब-ओव्हरसिअर यांची सही असल्याचे निर्देशनास आले आहे. याशिवाय संवर्ग बाहय सबओव्हरसिअर या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारे तांत्रिक मान्यतेचे अधिकार नसतांना संजय पाटील सब-ओव्हरसिअर मोठया प्रमाणावर अंदाजपत्रकांना अनाधिकाराने तांत्रिक मान्यता दिल्याचे निदर्शनास आले
आहे. याशिवाय विविध विकास कामांच्या मोजणी पुस्ताकातील नोंदी या नगरअभियंता यांनी अंतिम करणे बंधनकारक असतांना त्याबाबत आपले नगरपरिषद स्तरावर काय कार्यवाही झाली आहे? याबाबत चौकशी करणे या कार्यालयास
अनावश्यक वाटत आहे.

आपल्याब्दारे वरीष्ठ कार्यालयाव्दारे वारंवार मागविलेले अहवाल सादर न केल्यामुळे सदर प्ररकणी चौकशी करुन अंतिम आदेश पारीत करणेस अधिन राहुन सद्यस्थितीत तातडीने पुढील बाबींची अंमलबजावणी करणेबाबत आपणास आदेशित करण्यात येत आहे.
१. आपल्याकडे नगरअभियंता हे राज्य संवर्गातील पद कार्यरत असल्याने नगरअभियंता हेच आपले बांधकाम विकास विभागाचे विभाग प्रमुख असतील. संजय पाटील सब-ओव्हरसिअर हे नगरअभियंता यांच्या अखत्यारीत काम करतील . भविष्यात कुठल्याही कारणाने आपले आस्थापनेवरील नगरअभियंता हे पद रिक्त
झाल्यावर देखील सब-ओव्हरसिअर हे नगरअभियंता/अभियंता म्हणून सहीचे अधिकार असणार नाही याची नोंद घ्यावी.

२. सर्व अंदाजपत्रकावर नगरअभियंता हे राज्य संगर्वातील अधिकारी म्हणून सही करतील. यापुढे कुठल्याही परिस्थिती नगरअभियंता/अभियंता म्हणून संजय पाटील यांनी सही केल्यास ते गंभीर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहतील. याबाबत आपलेस्तरावरून संबधितास कळवावे

३. विविध विकास कामांचे देयके नोंदविण्याचे मोजमाप पुस्तिकेवर नगरअभियंता यांचीच अंतिम सही घ्यावी .

४. महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता-२०११ मधील नियम क्रं. १२४ नुसार केवळ नगरअभियंता यांना विहित रकमेच्या मर्यादेपर्यंत तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यास्तव संजय पाटील यांना कुठल्याही रकमेच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार असणार नाही, याची नोंद घ्यावी.

५.वारंवार कळवून देखील आपण सदर प्रकरणी अहवाल सादर न केल्या मुळे संजय पाटील सब ओवरसीयर नगरपरिषद अमळनेर अनाधिकाराने केलेल्या कामांबाबत आणि त्यांच्या बाबतीत झालेल्या तक्रारींबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात येईल.सदर चौकशी नंतर योग्य ते आदेश पारित करण्यात येतील.असे पत्र मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अमळनेर मुख्याधिकारी न प यांना दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button