Amalner

अखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल  गुन्हा दाखल..

अखेर चार महिन्यानंतर लोण बु येथील आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल..

अमळनेर तालुक्यातील लोण बु येथे जून महिन्यात शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादा ला कंटाळून रवींद्र देवराम पाटील यांनी आत्महत्या केली होती. सदर प्रकरणात चार महिन्यांनंतर पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील लोण बुद्रुक येथील रवींद्र देवराम पाटील यांचे त्यांच्या शेतशेजारील बंडू शिवाजी पाटील व शिवाजी हिरामण कोळी यांच्याशी शेतातून जाणाऱ्या गाड रस्यावरून वाद सुरू होते. २ एप्रिल २००७ रोजी विलास गोरख पाटील (ह.मु.बेटावद) यांनी रेशन दुकानातून रॉकेल चोरले होते. रवींद्र पाटील यांनी त्याला हटकले होते. त्यावेळी विलास पाटील व बंडू पाटील यांनी शिविगाळ केली. तेव्हा पासून ते रवींद्रचा द्वेष करत होते. ६ एप्रिल २१ रोजी बंडू याने शेतात जाण्याच्या रस्त्यावर गोठा बांधून अडथळा निर्माण केला. रवींद्र पाटीलने वहिवाटीसाठी तहसीलदाराकडे अर्ज केला. तक्रार अर्ज का केला म्हणून बंडूचा मुलगा यशवंत पाटील, भाऊ आनंदा शिवाजी पाटील हे त्रास देत होते. रस्त्यावरून येणे जाणे बंद करण्यासाठी बंडू याने जेसीबी ने खोदकाम करणे सुरू केले. रविंद्र पाटील जेसीबीला आडवे झाले म्हणून बंडू,यशवंत, यांनी धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ केली होती.

8 जून रोजी रवींद्र पाटील ह्यांचा संशयास्पद अवस्थेत शेतात मृतदेह आढळून आला होता. ८ जून रोजी पहाटे दुचाकीने (क्रमांक एम. एच. १८, ए ई ५०१३) शेतात पाणी
भरण्यास गेले असता शेतात बाभळीच्या झाडाजवळ नाल्यात लागून मातीत मरण
पावलेल्या स्थितीत पालथे पडले होते.त्यांच्या विरुद्ध तक्रार तब्बल चार महिन्यानंतर अखेर रवींद्रच्या पत्नी प्रतिभा पाटील यांच्या फिर्यादीवरून बंडू शिवाजी पाटील, यशवंत बंडू पाटील, आनंदा शिवाजी पाटील, सुभाष गंगाराम
पाटील , विलास गोरख पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button