Nandurbar

जिल्हाधिकारी यांचे 15 दिवस लॉक डाऊन आदेशा नंतर जिल्हाधिकारी यांना एम आई एम चे प्रश्नार्थक निवेदन.

जिल्हाधिकारी यांचे 15 दिवस लॉक डाऊन आदेशा नंतर जिल्हाधिकारी यांना एम आई एम चे प्रश्नार्थक निवेदन.

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : आज दिनांक 31 मार्च मंगळवार रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. राजेंद्र भारूड यांना एम आई एम जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांनी त्यांचे 15 दिवस जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉक डाऊन च्या आदेशा नंतर प्रश्नार्थक निवेदन देण्यात आले ज्यात म्हटले आहे की जिल्ह्यात कुठलेही उद्योग धंदे नसुन सुमारे 80% चे वर हात मजुरी करुन आपला व परिवाराचे उदरनिर्वाह करणारे लॉक आहे, जे रोज मजुरी करुन पैसे आणुन आपले घर चालवतात, हे लॉक डाऊन चे 15 दिवस त्या लोकांनी आपले व परिवाराचे पोट कसे भरायचे ? अश्या लोकांना शासनाने राशन दुकानांवर 15 दिवस फुकट राशन द्यावे. तसेच जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात रुग्णां कडुन अव्वाच्या सव्वा पैशांची वसूली वर कार्रवाई करण्यावर लक्ष वेधले, तसेच अत्यावश्यक सुविधांसाठी सकाळी 07:00 ते 11:00 च्या वेळेत बदल करुन सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 वाजे पर्यंत करण्यात यावे. सुमारे 15 मिनिट चाललेल्या या संभाषणात जिल्हाधिकाऱयांनी आश्वासन दिले की राशन बाबत त्वरीत वरिष्ठांना पत्र पाठवतो, खाजगी रुग्णालयात होत असलेल्या अश्या गैर प्रकारांची तक्रार आम्हाला द्या आम्ही नक्कीच कडक कार्यवाही करू व वेळेत बदल करण्याबाबत सर्व सहकाऱ्यांची मीटिंग घेवुन निर्णय करू.
तसेच त्यांनी कोरोना केसेस ची वाढ़ती संख्या बघता जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा होऊ नये म्हणुन जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट लावण्यास मंजुरीसाठी पाठ पुरावा केला आहे तसेच जिल्ह्यात 42 ठिकाणी वाक्सीन सेंटर दिले असुन 45 वर्षाचे वय असलेले सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेण्यात यावा यासाठी लोकांना आव्हान करण्यास जिल्हाधिकारी यांनी एम आई एम जिल्हाध्यक्ष यांना बोलत वरील सर्व मुद्द्यांवर सकारात्मक आश्वासन दिले आहे.

यां वेळी पक्षाचे पदाधिकारी फेरोज बेलदार, अशपाक शेख, रिजवान खान, फहिम शेख, जूबेर शेख आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button