Nashik

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दिंडोरी , वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दिंडोरी , वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांनी तक्रार दाखल केली असून समाजात द्वेष निर्माण करणारे वक्तव्य राणे यांनी केले आहे.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटिल ,तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, युवा सेना तालुकाप्रमुख निलेश शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ अस्मिता जोंधळे आदी उपस्थित होते.
वणी येथेहि माजी प. समिती सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. विलास निरगुडे यांनी केद्रींय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यावेळी जि.प. सदस्य सौ छायाताई गोतरणे, राजेंद्र गोतरणे, प्रदिप देशमुख, जगन सताळे, राकेश थोरात, कचरू गोरे, चेतन पिठे, अवेश खान, गवळी काळाभाई बबन आदीसह कार्यकते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button