Pandharpur

व्यावसायिक महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

व्यावसायिक महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: बारामतीत शहरातील व्यावसायिक महिलेचा खूनच…हार्ट अटॅक आला असं सांगून केला होता अंत्यविधी….
एका डॉक्टरची फिर्याद,खून करणाऱ्या फडतरे कुटुंबाच्या मुसक्या बारामती शहर पोलिसांनी आवळल्या.
क्रांतीकारी आवाज संघटनेचा पाठपुरावा यशस्वी.

बारामती शहरातील कसबा परिसरातील एका महिलेला दि.11नोव्हेंबर रोजी बारामतीतील एका प्रतिष्टीत कुटुंबातील सदस्यांनी गंभीर मारहाण केली होती. ती महिला रात्रभर त्या संशयीत आरोपीच्या जुन्या वाड्यात पडून होती. सकाळी संशयित आरोपी असलेल्या बहीण भावांनी तिला दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला. परंतू उपचारपूर्वी तिचा मृत्यू झाला. दरम्यान त्या महिलेला हार्ट अटॅक आला असे भासवून तिचा अंत्यविधी उरकण्यात आला. मात्र लोकांच्या चर्चेतून संबंधित महिलेचा खून झाल्याचा सूर उमाटला होता. याबाबत क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी या घटनेतील अनेक बाबी समाजमाध्यमावरून लोकांसमोर आणली व बरीच गुप्त माहिती पोलिसांना ही दिली. बारामती शहर पोलिसांनी याबाबत कोंबिग ऑफ्रेशन राबवित बरीच माहिती संकलन केली. त्यामुळे यातून बरंच गौडबंगाल समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. त्यामुळेच आता खून करणारंबरोबर पुरावा नष्ट करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी पुढं करण्यात येणार आहे.

दरम्यान रात्री उशिरा बारामती शहरातील एका डॉक्टर च्या तक्रारीवरुण खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..यातील आरोपी असलेली मुलगी कल्याणी उर्फ कल्ली फडतरे, ऋषिकेश फडतरे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button