India

Navratri Soecial: दुर्गेची मूर्ती बनविण्यासाठी वेश्येच्या अंगणातील मातीच का आणली जाते..? जाणून घ्या कारण

Navratri Soecial: दुर्गेची मूर्ती बनविण्यासाठी वेश्येच्या अंगणातील मातीच का आणली जाते..? जाणून घ्या कारण

उद्या पासून देशभरात आता नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव सुरु होत असून दुर्गेच्या मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी मूर्तींवर शेवटचा हात फिरवून मूर्ती पूजेसाठी आणि विक्रीसाठी तयार ठेवल्या आहेत. बंगाल मध्ये दुर्गापूजा हा महत्वाचा उत्सव आहे. परंपरेनुसार दुर्गेची मूर्ती बनविताना प्रथम वेश्यागृहात जाऊन तेथील माती आणली जाते आणि ती नदीकाठच्या मातीत मिसळून त्यापासून मूर्ती घडविली जाते.

या परंपरेमागे असे कारण दिले जाते, कि वेश्यागृहात पाउल टाकणारी महिला असो वा पुरुष, आत जाण्यापूर्वी सर्व पवित्रता आणि चांगुलपणा बाहेरच सोडतो त्यामुळे वेश्यागृहाच्या दरातील माती पवित्र बनते. त्यामुळे तेथून प्रथम माती मागून आणली जाते. दुसरी कथा अशीही सांगतात कि एक वेश्या दुर्गेची निस्सीम भक्त होती. तिचा समाजाकडून तिरस्कार केला जाऊ नये म्हणून दुर्गादेवीनेच तिच्या अंगणातील माती घेऊन त्यापासून मूर्ती बनवावी आणि पुजावी असा आदेश दिला आणि तेव्हापासून हि प्रथा सुरु झाली.

अन्य काही जणांच्या मते वेश्याव्यवसाय हा वाईट मानला जात असला तरी वेश्या हा समाजाचा भाग असतात आणि दुर्गा पूजा निमित्ताने तरी त्यांना थोडी मानाची वागणूक मिळावी आणि तुम्ही आमच्या समाजातील आहात असा विश्वास मिळावा म्हणून हि प्रथा सुरु झाली असावी.
ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात घट बसवून देवीचा उत्सव साजरा केला जातो, तर उत्तर भारतात नवरात्र आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे दुर्गापूजेची तयारी चालू आहे. देवीच्या आराधनेसाठी ठिकठीकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. बंगालमध्येतर काही लोक स्वतःच्या घरात 10 दिवस मूर्तीची स्थापना करतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे, देवीची मूर्ती बनवण्यासाठी वेश्यालायासमोरील मातीचा उपयोग करतात. होय हे सत्य आहे कारण ही माती जितकी दुर्गा पवित्र आहे तितकीच पवित्र समजली जाते.

पश्चिम बंगालमध्ये उत्तर कोलकात्याच्या कुमरटली भागात जास्त प्रमाणात देवीच्या मुर्त्यांची निर्मिती केली जाते. इथल्या मुर्त्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. याचे कारण कारागिरांची कलाकुसर हे तर आहेच मात्र तसेच इथल्या मुर्त्या बनवल्या जातात त्या रेड लाईट एरिया ‘सोनाघाची’मधील मातीपासून. दुर्गा पूजेच्या आराधनेसाठी जी मूर्ती बनवतात त्यामध्ये विशेषतः 4 गोष्टींचा उपयोग केला जातो. गंगेच्या किनाऱ्यावरील माती, गोमुत्र, शेण आणि वेश्यालयाच्या अंगणातील माती.

जगभरात सर्वत्र वेश्यांना कमी लेखले जाते. इतर लोकांच्या दृष्टीने त्यांची कोणतीही किंमत नसते. मात्र देवीची मूर्ती बनवताना वेश्येच्या अंगणातील मातीचा उपयोग केला जातो. असे का असावे? तर प्राचीन काळी एक वेश्या देवी दुर्गेची असीम भक्त होती. या वेश्येला लोकांच्या तीरस्कारापासून वाचवण्यासाठी स्वतः देवीने तिच्या अंगणातील मातीचा उपयोग करून मूर्ती बनवली जावी हा वर दिला होता.
काही लोक असे मानतात की, एखादी व्यक्ती वेश्यालयात जाते तेव्हा स्वतःमधील चांगले गुण, पवित्रता वेश्येच्या दारातच सोडून आत जाते. त्यामुळे त्या व्यक्तीचे चांगले कर्म आणि त्याची शुद्धता बाहेर राहते, यामुळे वेश्येच्या अंगणातील माती पवित्र बनते. म्हणूनच मूर्ती बनवण्यासाठी अशा पवित्र मातीचा उपयोग केला जातो.

तसेच वेश्येने स्वतःसाठी ज्या जीवनाची निवड केली आहे, ते जीवन इतरांसाठी फार मोठा अपराध आहे. त्यामुळे वेश्यांना त्यांच्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांच्याच घरातल्या मातीचा उपयोग केला जातो.

वेश्यांना समाजाने वाळीत टाकलेले असते. समाजात त्यांना कोणतेही स्थान नसते. नाही एक समाज म्हणून त्यांचा कधी विचार केला जातो. मात्र संस्कृतीमधील एका महत्वाच्या सणाद्वारे या वेश्यांना समाजधारेचा एक हिस्सा म्हणून मान्यता मिळावी हाच प्रयत्न त्यांच्या अंगणातील मातीचा वापर करून केला जातो.

पण सारी प्रथा दांभिकतेने भरलेली आहे. बहुसंख्य वेश्या या असंवेदनशील पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाची निर्मिती आहेत जी स्त्रियांना केवळ लैंगिक वस्तू मानतात. आपण देवी दुर्गाला तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो पण स्त्रियांचे शोषण आणि स्त्रियांवरील पुरुषांचे वर्चस्व याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो.

वेश्येच्या दारातून चिखल गोळा करायला निघालेला समाज वर्षभर आपलं अस्तित्व समाजात आहे हे सोयीस्करपणे विसरतो. त्यांना उत्सव आणि कौटुंबिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते. त्यांना पायदळी तुडवले जाते आणि घाणीत राहण्यासाठी सोडले जाते.

ज्यांना दुर्गापूजा मुर्तीमध्ये सेक्स वर्करच्या दारापाशी चिखल हवा आहे त्यांनी त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी काहीतरी करण्याची हिंमत दाखवली पाहिजे.

अशा सर्व विधी आणि रीतिरिवाज आपल्याला आठवण करून देतात की संपूर्ण जगाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला एकमेकांच्या समर्थनाची, समानतेची आवश्यकता आहे. कारण या विश्वातील प्रत्येक गोष्ट सहजीवनावर आधारित आहे. बदल परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. चला तर मग बदलू या आणि वेश्येच्या अंगणातील मातीच नाही तर तिलाही सन्मानाची वागणूक देवू या. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button