Chalisgaon

मुंडखेडे येथील शेतकऱ्याची फसवणूक पोलिसात गुन्हा दाखल..

मुंडखेडे येथील शेतकऱ्याची फसवणूक पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव : तालुक्यातील मुंदखेडे येथील शेतकऱ्याने वैद्यकीय उपचारासाठी मासिक ५ रूपये दराने चार लाख २० हजार रूपयांची रक्कम घेतली होती. या बदल्यात ६ एकर शेती गहाण खत करण्याच्या नावाखाली खरेदी खत करून या वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंदखेडे येथील तक्रारदार शेतकरी चंद्रकांत हनुमंत वाबळे (वय ७३) यांनी वैद्यकीय उपचारासाठी ५ रूपये मासिक दराने गावातील सोपान हरी ढगे यांच्याकडून सुमारे ४ लाख २० हजार रूपये घेतले. या रकमेच्या बदल्यात तक्रारदार चंद्रकांत वाबळे यांच्या नावे असलेली ६ एकर शेत जमीन संशयित आरोपींनी संगनमत करून गहाण खत करण्याच्या नावाखाली खरेदीखत करून घेऊन फसवणूक केली आहे. हा प्रकार १३ जून रोजी सकाळी १० ते ७ जुलै २०२० दरम्यान शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला.

याप्रकरणी चंद्रकांत वाबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सोपान हरी ढगे, परेश सोपान ढगे (दोन्ही. रा. मुंदखेडे, ता. चाळीसगाव) व धर्मा चंदन, कल्पना धर्मा चंदन (दोन्ही रा. देवळा, जि. नाशिक) यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४चे कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महावीर जाधव करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुंदखेडसह परिसरातील शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button