Nandurbar

प्रतिबंधित नॉयलान मांजा विक्री करणार्‍या एकाविरुध्द गुन्हा दाखल

प्रतिबंधित नॉयलान मांजा विक्री करणार्‍या एकाविरुध्द गुन्हा दाखलनंदुरबार फहिम शेखनंदुरबार शहर पोलिसांची कारवाई; 3300 रुपयांचा नॉयलान मांजा जप्तनंदुरबार- मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने वापर व विक्रीस प्रतिबंध घातलेला नायलॉन मांजा विक्री करतांना एकाला पकडुन 3300 रुपयांचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलिसांनी ही पहिली कारवाई केली असून नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍यांवर पोलिस नजर ठेवुन आहेत.मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी अनेकांकडून नॉयलान मांजाची विक्री व वापर होतो. परंतु नॉयलान मांजा नागरीकांसह पशुपक्षींच्या जिवितासाठी धोकेदायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करुन नॉयलान मांजा विक्री व वापरास देखील प्रतिबंध केल्याचे आदेश जारी केले आहे. नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात एक इसम नॉयलान मांजा विक्री करीत आहे. त्या माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने त्याठिकाणी जावुन पाहणी केली असता जळका बाजार परिसरातील धान्य दुकानाचा ओटावर एक इसम काळी रंगाची थैली घेवुन प्रतिबंदी असलेला नॉयलान मांजा विक्री करतांना मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने प्रकाश शामराव छत्रिय(वय 55, रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) असे नाव सांगितले. त्याच्याकडून 1600 रुपये किंमतीचे मोनोकिट नॉयलान मांजा प्लाटीक कोटींग असलेला दोन मोठे नग प्रत्येकी 800 रुपये किंमतीप्रमाणे, 400 रुपये किंमतीचा एक नगनॉयलान मांजा, 600 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा असलेले 2 लहान नग प्रत्येकी 300रुपये किंमतीचे, व 300 रुपये व 400 रुपये किंमतीची 2 लागडी चक्री सुरती मांजा नाव असलेला नॉयलान मांजा असा एकुण 3300 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोकॉ.श्रीकांत पाटील यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश शामराव छत्रीय(वय 55, रा. चौधरी गल्लीनंदुरबार) याच्याविरुध्द भादंवि कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी, पोहकॉ. जगदीश पवार,पोहेका सुनील मोरे, पोना. श्रीकांत माळी, पोकॉ.शैलेंद्र माळी, पोकॉ.श्रीकांत पाटील, पोकॉ.विजय नागोडे, पोकॉ.राहुल पांढारकर, पोकॉ.विशाल मराठे यांच्या पथकाने केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button