Amalner

Amalner: अंध प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे गटारीत पडले युवक..!

Amalner: अंध प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे गटारीत पडले युवक..!

अमळनेर येथील दगडी दरवाजाजवळ दोन युवक गटारीत मोटरसायकल सह पडून गंभीर जखमी झाल्याची अत्यन्त धक्कादायक घटना घडली. अमळनेर शहरात दगडी दरवाजा जवळ नेहमीच ट्राफिक जाम होत असते.त्यातच गेल्या अनेक महिन्यांपासून दरवाजाचे काम अत्यन्त संथ गतीने सुरू आहे. त्यातच दरवाजाच्या समोर असलेल्या गटारीवरील ढापा गायब झाला आणि त्या मोकळ्या गटारीत काल दोन युवक मोटरसायकल सह पडले.सदर अपघात हा नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने / आशीर्वादाने ठेकेदाराने अपूर्ण काम सोडून पळ काढल्यामुळे झाला असून आता किती लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागतो ते पाहणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न प लोकांचे बळी घेणार आहे का असा संतप्त प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे.
दुर्घटनेनंतर युवकांना गटारीबाहेर काढण्यासाठी परिसरातील रहिवाशी सरसावले आणि दुचाकीही बाहेर काढण्यात आली. यानंतर जखमी युवकांना तात्काळ उपचारार्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात विनोद सोनवणे.ताडेपूरा या युवकाचे डोके फुटले असून तीन टाके पडले आहेत. विनोद सह र0त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला ही दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

दगडी दरवाजाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून या खोळंबले आहे. अर्ध्याहून
अधिक रस्ता कोसळलेल्या बुरूजाच्या दगड, मातीने व्यापला आहे. या ठिकाणी
दिवसातून दहा वेळा वाहतुकीची कोंडी होते. दुचाकीस्वार इतर वाहनांचा जबरदस्त खोळंबा येथे होतो. गटार आजूबाजूला दगड,माती आणि वाढती ट्राफिक यामुळे येथे नेहमीच अपघात ही होत असतात.ही वाहतुकीची कोंडी ह्या दोन युवकांच्या जीवावर उठली होती.यावर कायमस्वरूपी मार्ग निघणे आवश्यक आहे.सदर गटारीवर तात्काळ ढापे टाकून शहर वाहतूक नियंत्रण शाखे कडुन कोणीही येथे उपस्थित नसते.शहर वाहतूक शाखेचे येथे कोणतेच नियोजन दिसून येत नाही. हा पावत्या फडण्यासाठी मात्र शहर वाहतूक नियंत्रण चे कर्मचारी फरशी फुलाच्या पलीकडे म्हणजे पैलाड भागात मात्र आवर्जून उभे असतात.असा संताप देखील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यात किंवा इतरवेळी पोट गटारी तुंबतात त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. या अपघातास अमळनेर न प प्रधासन,सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनच अधिक कारणीभूत असून दगडी दरवाजाचे काम युद्ध पातळीवर करून ताबडतोब ह्या भागातील रस्त्यावरील कचरा बाजूला करणे,रस्ता मोकळा करणे,गटारीवर ढापे टाकणे आवश्यक आहे.या अपघातानंतर तरी अंध प्रशासन जागे होईल का असा प्रश्न देखील जनता विचारत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button