Mumbai

आलिया भट च्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!पहा काय आहे प्रकार..!

आलिया भट च्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!पहा काय आहे प्रकार..!

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या रणबीर कपूरसोबत होणा-या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे अगदी खाजगी फोटो रणबीर सोबतचे व्हायरल झाले आहेत.सध्या आलिया एका नववधूच्या कपड्यांच्या एका ब्रँडच्या ‘कन्यादान’ असा विषय असलेल्या जाहिरात करत आहे. या जाहिरातीमुळे आलियाच्या विरोधात आणि संबंधित ब्रँडच्या विरोधात सांताक्रुझ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या जाहिरातीतुन जे विचार किंवा संदेश देण्यात आला आहे त्यामुळे हिंदू संस्कृतीचा अवमान करणारे असल्याचा आरोप करण्यात येऊन सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नववधूसाठी ड्रेस डिझाईन करणाऱ्या मान्यवर कंपनीच्या जाहिरातीवर तक्रारकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत नववधूच्या वेशामध्ये असलेल्या आलियाने जे बोलते त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं त्यांनी म्हटलं.

काय आहे जाहिरात

तर नववधू म्हणते की लग्नामध्ये ‘कन्यादान’ हा विधी का आहे? मुलगी म्हणजे एखादी वस्तू आहे का, म्हणून तिचे दान केले जाते. या जाहिरातीमध्ये ही नववधू तिच्या नवऱ्यासोबत लग्नमंडपात बसलेली दिसत आहे. ती आपल्या मनातील भावना तिच्या भावी नवऱ्याला सांगते आहे. घरातील सर्व सदस्य तिच्यावर किती प्रेम करतात हे ती त्याला सांगते. हे विचार अनेक लोकांना आवडले नाहीत.त्यामुळे कोणताही मागचा पुढचा विचार न करता सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button