Pandharpur

भ्रष्टाचारी ग्रामसेवक पी.आर.देवकर यांच्यावर फौजदारी दाखल करा – योगेश चव्हाण

भ्रष्टाचारी ग्रामसेवक पी.आर.देवकर यांच्यावर फौजदारी दाखल करा – योगेश चव्हाण

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चळे ग्रामपंचायतीचे तथकालीन ग्रामसेवक पी.आर.देवकर यांनी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग निधीमधून 15 लाख 99 हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी यांच्या अहवालानुसार ग्रामसेवक पी.आर.देवकर यांना सेवेतुन निलंबित करण्यात आले होते.परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नसुन तो त्वरीत दाखल करावा अशी मागणी सोलापूर युवा सेना उपजिल्हा अधिकारी योगेश चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असुन जर ग्रामसेवक देवकर यांच्यावर संबधित विभाग अधिकारी यांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल नाही केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही योगेश चव्हाण यांनी या लेखी निवेदनामध्ये दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button