Baramati

आदिवासी पारधी समाजा बद्दल अपशब्द वापरून,समाज्याची बदनामी करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करा.

आदिवासी पारधी समाज्याबद्दल अपशब्द वापरून,समाज्याची बदनामी करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करा.

प्रतिनिधी – श्री.आनंद काळे

बारामती- बारामती तालुक्यातील मौजे निरावागज येथील देवकाते कुटुंबातील व्यक्तीचे जमिनीचा दावा चालू असताना, एकमेकांच्या जागेतून जाता येताना एकमेकांची अडवणूक होत होती.त्याबद्द्ल बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे एकमेकांविरुद्ध तक्रारी पण दाखल आहेत.

दि.13/02/2022 रोजी सायं 5:30 दरम्यान प्रियंका देवकाते व त्याच्या कुटुंबातील व्यक्ती रस्त्याने जात असताना त्यांची त्या ठिकाणी अडवणूक झाली.त्यातच प्रियंका देवकाते हिने शिवीगाळ व मारहाण होऊ लागल्याने स्वतःच्या मोबाईलवरून व्हिडिओ चित्रीकरण केले त्यामध्ये आदिवासी पारधी समाज्याची नाहक बदनामी व समाज्याबद्दल अपशब्द वापरले.आदिवासी पारधी समाज्यातील कोणत्याही व्यक्तीचा त्या घटनेशी संबंध नसताना व ही घटना देवकाते कुटुंबातील लोकांची,जमिनीच्या वादातील असताना त्यामध्ये आदिवासी पारधी समाज्याची त्याठिकाणी बदनामी करण्यात आली.
आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे यांनी या घटनेची दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोग,अनुसूचित जाती जमाती आयोग आदी.मान्यवराना निवेदनाची प्रत पाठवून आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
सदर घटनेमध्ये १)उषा बाळासाहेब देवकाते२)राणी शिवाजी देवकाते ३)तृप्ती शिवाजी देवकर ४)रुचिता शिवाजी देवकाते ५)बाळूबाई पोपट देवकाते ६) जानकी गणेश देवकाते ७) रणजित पांडुरंग देवकाते ८)निखिल शिवाजी देवकाते ९)अभिजित बाळासो देवकाते १०) महादेव साहेबराव देवकाते सर्व रा.मुरूमआळी,देवकाते वस्ती निरावागज ता.बारामती जि. पुणे येथील रहिवासी आहेत.वरील व्यक्तीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे यांनी दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button