Ratnagiri

आदिवासी मजुरांची फसवणूक करून फरार झालेल्या ठेकेदारवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा: सुशिलकुमार पावरा13 मजुरांची दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आदिवासी मजुरांची फसवणूक करून फरार झालेल्या ठेकेदारवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा: सुशिलकुमार पावरा13 मजुरांची दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

रत्नागिरी : आदिवासी मजुरांची फसवणूक करून फरार झालेल्या श्री.सुरेश लोणे ठेकेदार रा.नेहकर जिल्हा वाशिम यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दापोली यांना निवेदन देऊन केली आहे. ठेकेदार सुरेश लोणे यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत बिरसा क्रांती दल संघटनेचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष यांनीही संघटनेचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ मॅडम यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सुरेश लोणे ठेकेदार जिल्हा वाशिम यांनी आदिवासी मजूरांना काम करवून मजूरी न देता फरार झाला आहे. श्री.सुरेश लोणे ठेकेदार जिल्हा वाशिम यांनी आम्हाला गावाकडून तहसिल व ग्रामपंचायत अंतर्गत महानेट पोल कामासाठी आणले होते.त्यांनी आम्हाला कुंभसाखर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे कामासाठी नेऊन काम पूर्ण करून घेतले माञ कामाचे एकूण पैसे न देता परस्पर त्याच्या गावी आम्हाला फसवून निघून गेला.आम्हाला गाडीत डिझेल टाकण्यासाठी फक्त 5000 / रूपये दिलीप वळवी यांच्या खात्यात टाकले. त्याच पैशाने गाडी कामाच्या ठिकाणी फिरवली.नंतर फक्त 1 रूपया दिनांक 27/02/2021 रोजी सायंकाळी 7.51 मिनीटांनी दिलीप वळवी यांच्या सेंट्रल बॅक खात्यात फोनपेने पाठवले. त्यानंतर आमचा पैशाचा कुठलाच व्यवहार झालेला नाही. उलट अजमा वळवी यांनी सुरेश लोणे ठेकेदार यांच्या खात्यात दिनांक 11/02/2021 रोजी 15000/ रूपये ट्रान्स्फर केले. आम्ही एकूण 13 मजूरांनी ( अनिल वळवी,मनोज वळवी, रोशन वळवी, सुरसिंग वळवी , संजय ठाकरे ,टेट्या तडवी, निलेश तडवी, दौलत वळवी,गणपत वळवी ,रूशन्या वळवी ,रावजी पटले सगळे रा.केलीमोजरा तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार)
सलग 10 दिवस काम केले. त्या कामाचे आम्ही ठेकेदार सुरेश लोणे यांच्याकडे मागणी केली तेव्हा त्यांनी पैसे पाठवल्याची खोटी पावती स्क्रीन शाॅट पाठवली.त्या पैशाची आम्ही चौकशी केली असता आमच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही असे दिसून आले. उलट अ त्यानंतर फोनद्वारे आम्ही सुरेश लोणे यांच्या कडे मजूरी मागणी केली असता मी तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करून घ्या. केबलची वायर पेटवून गावी निघून जा व मला विडीओस पाठवा,अशी धमकी व फसवणूक केली. आम्हाला गावी जायला आता भाड्यासाठी पैसे शिल्लक नाहीत, त्यांनी आम्हाला धमकी देत आमची फसवणूक केली आहे.
म्हणून त्याच्या फौजदारी गुन्हे दाखल करून पोलिस कारवाई करण्यात यावी व आमची मजूरी रक्कम त्याच्याकडून आम्हाला परत मिळवून द्यावी. याबाबत आम्ही सर्व मजूर व सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ मॅडम यांना संपूर्ण हकीकत सांगितली आहे. ठेकेदार सुरेश लोणेवर यांच्या विरोधात आमची रितसर व कायदेशीर तक्रार आहे,तरी सदर ठेकेदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दापोली यांना केली आहे. यावेळी सुशीलकुमार पावरा सोबत 13 आदिवासी मजूर पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button