Amalner

दोन गटात हाणामारी, एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल… तालुक्यातील तळवाडे येथील घटना…

दोन गटात हाणामारी, एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल… तालुक्यातील तळवाडे येथील घटना…अमळनेर:- तालुक्यातील तळवाडे येथे दोन गटात हाणामारी झाली असून दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रथम फिर्यादीत फिर्यादी नाना शिवराम पाटील रा. तळवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २६ रोजी ते दूध मोजून परत जात असताना गाव दरवाज्याजवळ नितीन उखा पाटील, रुपाबाई उखा पाटील, विमलबाई सुखदेव पाटील व उख बुधा पाटील या चौघांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करत नितीन याने हातातील दगडाने डोक्यावर तसेच बुक्क्यांनी तोंडावर मारले व इतर तिघांनी खाली पडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी गावातील लोकांनी सोडवणूक केली. त्यानतंर फिर्यादी घरी गेले असता वरील चार ही जण परत घरी आले. व नितीन याने फिर्यादी चा मुलगा किशोर यास लोखंडी विळ्याने डाव्या हातावर मारून जखमी केले. त्यानतंर घरातील टीव्ही व इतर वस्तूंचे नुकसान करून निघून गेले. त्यावरून नितीन उखा पाटील, रुपाबाई उखा पाटील, विमलबाई सुखदेव पाटील व उख बुधा पाटील या चार ही जणांविरुद्ध भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ४५२, ४२७, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.दुसऱ्या फिर्यादीत फिर्यादी नितीन उखा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २६ रोजी संध्याकाळी फिर्यादी घरी येत असताना मंदिरावर बसलेल्या सुरेश डोंगर पाटील यांना बोलले की, तहसीलदारांनी दिलेला रस्ता वापरू दिला असता तर माझ्या बैलाचा पाय मुरगळला नसता. असे सांगून घरी आलो असता गावातील किशोर नाना पाटील, नाना शिवराम पाटील, आशाबाई नाना पाटील, सुरेश डोंगर पाटील, संजय चुडामन पाटील, संजय डोंगर पाटील, कुणाल संजय पाटील, योगेश संजय पाटील, छोटू बापू पाटील, स्वप्नील छोटू पाटील, राकेश छोटू पाटील, व किशोर नाना पाटील यांची पत्नी नाव माहीत नाही यांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादी चे वडील चहा पीत असताना शेताच्या वाहीवाटीच्या कारणावरून लोखंडी पाईप ने फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीची आई रुपाबाई ही अडविण्यात आली असता स्वप्नील बापू पाटील व छोटू बापू पाटील यांनी तोंडावर बुक्का मारल्याने दोन दात पडले आहेत. फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारल्याने मुक्का मार लागला. त्यावेळी फिर्यादीच्या हातातली सोन्याची ५ ग्रॅम ची अंगठी गहाळ झाली आहे. त्यावेळीच घरातील सामान टीव्ही व सामानाची तोडफोड करण्यात आली. फिर्यादीच्या वडिलांना देखील मारहाण केली. तसेच वरील बारा आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून वरील बारा आरोपींविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम १४३, १४४, १४७, १४९, ३२५, ३२४, ३२४, ५०४, ५०६, ४५२, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button