sawada

कोरोना संकटास नामोहरम करण्यासाठी सण उत्सव मर्यादितच साजरे करावेत- पोलिस उपअधीक्षक लंवाड

कोरोना संकटास नामोहरम करण्यासाठी सण उत्सव मर्यादितच साजरे करावेत- पोलिस उपअधीक्षक लंवाड

सावदा/युसूफ शाह

कोरोना महामारीची तीसरी लाट अती भयंकर आहे केरळमध्ये या लाटेनं हाहाकार माजविला आहे आपण निरोगी राहिले तर सण आयुष्यभर साजरे होतील त्याकरिता गणेशोत्सवात गणेश मंडळांनी सर्व शासनादेशांचे काटेकोर पालन करावे आपले जीवन अनमोल आहे आपण ही सुखरूप रहा आणि कुटूंबातीयांना ही आनंदी ठेवण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटी बेठकीदरम्यान केले सपोनि डी.डी.इंगोले, पीएसआय राजेंद्र पवार यांनी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावलींचे माहिती दिली
आज मोठा वाघोदा ग्रामपंचायत कार्यालयात सावदा पोलिस स्टेशन तर्फे पोळा,गणोशोत्सव सणांचे पार्श्वभूमीवर शांतता कमेटी समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थित अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री लवांड साहेब,सपोनि देविदास इंगोले, पीएसआय, राजेंद्र पवार, पीएसआय गायकवाड होते सरपंच मुबारक (राजू) अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी पोलिस पाटील दिपक पाटील उपस्थित होते बैठकीत सर्व प्रथम नव्याने मुक्ताईनगर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री लवांड साहेब यांचे सरपंच मुबारक तडवी यांनी तर सपोनि देविदास इंगोले पीएसआय राजेंद्र पवार पीएसआय गायकवाड यांचे उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, जब्बार शेख, इक्बाल खान आदिंनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कुलदीप पाटील, पत्रकार कमलाकरमाळी,नजरुसेठपो.पो.हे कॉ.विनोद पाटील पो कॉ.सुरेश अढांयंगे, गोपनीय शाखेचे पो.कॉ.देवेंद्र पाटील सुनिल पाटील,सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button