Maharashtra

मोठा वाघोदा कोरोना मुक्तीकडे १३ पैकी १० कोरोनामुक्त २ मयत तर एकावर उपचार सुरू

मोठा वाघोदा कोरोना मुक्तीकडे १३ पैकी १० कोरोनामुक्त २ मयत तर एकावर उपचार सुरू
मोठा वाघोदेकरांसाठी दिलासादायक बातमी

प्रतिनिधी मुबारक तडवी

येथील १३पैकी १० रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरवापसी झाली तर दोन मयत रुग्ण झालेले आहेत तर एक संक्रमित महिला रुग्णावर कोविड १९ सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत
मोठा वाघोदा तालुका रावेर येथे प्रथम ८ जून रोजी रजा कॉलनीतील एक महिला कोरोना संक्रमित रुग्ण आढळली होती त्यापाठोपाठ याच कुटुंबातील १९ जणांना तर सातगल्लीतील महादेव मंदिर परिसरातील मयत संक्रमित रुग्णाचे कुटुंबातील ६ व्यक्ती आणि पाटील पुरी गल्लीतील एका संक्रमित मयताचे कुटूंबातील ३ व्यक्तींना स्वॅब तपासणीसाठी रावेर येथील कोविड सेंटरला क्वारंटाईन करण्यात आले होते यापैकी आणखी ८ व सातगल्लीतील महादेव मंदिर परिसरातील १ आणि पाटील पुरी गल्लीतील एका संक्रमित मयत पुरुषाचे कुटूंबातील १ अशा एकूण ११ जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल अहवाल प्राप्त झाले होते मोठा वाघोदा गावात एका पाठोपाठ २ मयतासह ११ कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती व जनजिवन ही विस्कळीत झाले होते याचं अनुषंगाने कमांडंट ऑफिसर भोजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले. रावेर च्या तहसीलदार उषा राणी देवगुंणे तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन पदाधिकारी महसूल प्रशासन आरोग्य विभाग व सर्व कर्मचारी यांनी विशेष लक्ष केंद्रित करून गावात विविध उपाय योजना सह ग्रामपंचायतीने केलेल्या पाच दिवशीय जनता कर्फ्यू ला वाघोदा वासियांनी ही सहभाग नोंदवित जनता कर्फ्यू १००% यशस्वी करीत कोरोनाची साखळी तोडण्यास यश मिळविले आहे १३ संक्रमित रुग्णांपैकी दोन मयत असून रजा कॉलनीतील ९ व सातगल्लीतील महादेव मंदिर परिसरातील १ अशा एकूण १० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनाला हरवित कोरोनामुक्त होत विजयश्री मिळविला आहे व त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळालेली आहे यासह एका संक्रमित महिला रुग्णावर उपचार सुरू असून लवकरच ही महिला रुग्ण ही कोरोनावर विजय मिळविणार असल्याचंही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे या अनुषंगाने मोठा वाघोदा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याची दिलासादायक वृत्त रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराज पाटील यांचेशी संपर्क केला असता त्यांनी ह्या माहितीला दुजोरा दिलेला आहे तरी गांव कोरोनामुक्त झाल म्हणजे सर्व संपलं या गुमानित गावकर्यांनी न राहता सावधानता बाळगावी , घराबाहेर पडताना सुरक्षितता पाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडावे तसेच शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीसह प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button