Amalner

दुधाचे पैश्यांवरून गलवाडे येथील बाप लेकास मारहाण..!

दुधाचे पैश्यांवरून गलवाडे येथील बाप लेकास मारहाण..!

अमळनेर:- दुधाचे पैसे बाकी असल्याच्या कारणावरून गलवाडे येथील बाप लेकास मारहाण करण्यात आली आहे. फिर्यादी शिवाजी वामन भदाणे (रा. गलवाडे) हे परिसरातील शेतकऱ्याकडून दूध गोळा करून जळगाव येथे पाठवत असतात. झाडी येथील युवराज परभत पाटील याने त्यांच्याकडे दूध देणे बंद करून मागील पैसे आताच दे असे सांगत वाद घातला होता. त्यावेळी गावातील लोकांनी वाद मिटवला होता. दि. २४ ऑगस्त रोजी शिवाजी भदाणे हे दूध गोळा करून गलवाडेकडे परतत असताना झाडी येथे युवराज पाटील यांच्या पत्नीने मोटरसायकल अडवून पैशांची मागणी केली. यावेळी फिर्यादी यांनी बँकेतून पैसे काढून देतो असे असता परंतु दांपत्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर युवराज पाटील याने टॅमीने मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यदीचा मुलगा याने अडवल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. ते दोघे पिता पुत्र जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून युवराज पाटील व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. कॉ. सचिन निकम करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button