Amalner

राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..संयुक्त कृती समितीचा इशारा

राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांसाठी 28 पासून उपोषण..

अमळनेर येथील राज्य परिवहन महा मंडळातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात दि 27 ऑक्टोबर 2021 रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.संयुक्त कृती समितीने या आधी मुंबई मुख्य कार्यालय आणि विभागीय कार्यालयात उपोषण केले असून दि 28 ऑक्टोबर रोजी सदरील प्रश्न मार्गी न लागल्यास संयुक्त कृती समिती अमळनेर येथील आगारात उपोषणास बसणार आहे.या संदर्भातील पत्रे व्यवस्थापक बस आगार, तसेच अमळनेर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. सदर निवेदनावर संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष एस टी कामगार संघटना, अध्यक्ष,महाराष्ट्र एस टी कामगार सेना, अध्यक्ष इंटक तसेच वरील सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button