Amalner

जवखेडा येथे शेतकरी दैनंदिन ऍप ची माहिती कँप…

जवखेडा येथे शेतकरी दैनंदिन ऍप ची माहिती कँप…

जवखेडा गावामध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील लखपती किसान या घटकांमधील शेतकऱ्यांची दैनंदिनी डायरी सध्याच्या कालावधीमध्ये किती महत्त्वाची आहे शेतकऱ्यांनी आपला शेती व शेती व्यवसायाची निगडित दैनंदिनी खर्च पाणी फाउंडेशन च्या शेतकरी दैनंदिनी ॲप मध्ये कशा पद्धतीने वही पेन चा उपयोग न करता कुठेही कधीही व केव्हाही कशा पद्धतीने दैनंदिनी डायरी मध्ये भरावयाचा यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये जवखेडा गावचे माजी जि प सदस्य संदीप पाटील तसेच जवखेडा गावचे सरपंच उपसरपंच व इतर सदस्य तसेच ग्राम रोजगार सेवक यांनीदेखील हे ॲप कशा पद्धतीने भरावयाचे हे समजून घेतले त्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या गावांमध्ये खूप काही मोठ्या प्रमाणात आपणास वेगवेगळी कामे करता येतात या संदर्भात देखील सविस्तर चर्चा केली व गावचा नियोजन आराखडा व समृद्धी आराखडा खूप चांगल्या पद्धतीने करून घेण्याचे सर्वानुमते ठरले.

संबंधित लेख

Back to top button