Jalgaon

जळगांव: लग्नात वऱ्हाडी बनून लाखो रु ची चोरी…!

लग्नात वऱ्हाडी बनून लाखो रु ची चोरी…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळात लग्नात वऱ्हाडी बनून येत दागिने लंपास करण्याची धक्कादायक घटना घडली असून राहुल वासुदेव भामरे वय ३७, रा.साईनगर, जळगाव ह्या अट्टल चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.. संशयिताच्या ताब्यातून १ लाख ७० हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत.

याबातीत सविस्तर माहिती अशी की भुसावळ येथील बालाजी लॉनमध्ये दि.२८ नोव्हेंबरला झालेल्या विवाह समारंभात विनायक शिवाजी दराडे (वय ३०, रा. साईकिरण अपार्टमेंट, वायलेनगर, खडकपाडा, कल्याण) यांच्या पत्नीची पर्स खोली क्र 5 मधून चोरीस गेली होती. या पर्समध्ये १ लाख १० हजार ७५४ रुपयांचे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजारांची रोकड होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. पोलिसांनी बालाजी लॉन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, तसेच रेकॉर्डवरील संशयितांची चाचपणी केल्यानंतर गोपनीय माहितीवरून राहुल भामरे याला ८ डिसेंबरला ताब्यात घेऊन चाैकशी केली.संशयीत भामरे विरोधात दर्यापूर (जि.अमरावती) न्यायालयाने घरफोडीच्या गुन्ह्यात वॉरंट काढले असून तो त्यात फरार असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच भुसावळ शहर पोलिस घरफोडीच्या गुन्ह्यातही त्याच्या शोधात होते.
संशयीत राहुल भामरे याला गोपनीय माहितीवरून दि.८ डिसेंबरला ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित राहुल भामरे याने चोरलेले दागिने जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये विकल्याची कबुली दिली. पाेलिस पथकाने बाफना ज्वेलर्समधून एक लाख १४ हजार ४४६ रुपयांचे दागिने जप्त केले. दरम्यान, भामरे याच्याकडे कोणतेही बील नव्हते, त्यामुळे त्यांनी सोने खरेदीस नकार दिला मात्र त्याने दवाखान्याची अडचण सांगितल्याने त्यांनी सोने खरेदी केले व त्यास रितसर रकमेचा धनादेश दिल्याचे बाफना ज्वेलर्सतर्फे सांगण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button