Maharashtra

शेतकरी दुष्काळाने त्रस्त आणि स्वयंघोषित भूमिपुत्र उद्दघाटनांमध्ये व्यस्त…भूमी पूजने करताय..दुष्काळा संदर्भात कधी तोंड उघडणार..!

शेतकरी दुष्काळाने त्रस्त आणि स्वयंघोषित भूमिपुत्र उद्दघाटनांमध्ये व्यस्त…भूमी पूजने करताय..दुष्काळा संदर्भात कधी तोंड उघडणार..!

अमळनेर तालुक्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.अमळनेर तालुक्यात पावसाने दडी मारली बळी राजाला आता पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस गायब झाला आहे. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते शेतकरी संकटात सापडले आहेत.तिबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहेत.आमचे आमदार खासदार हे ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.स्वयं घोषित तथाकथित भूमिपुत्र उद्दघाटने करण्यात व्यस्त आहेत.कारण जी उद्दघाटने सुरू आहेत ती फायद्याची आहेत त्यांचे टेंडर निविदा किंवा काम त्यांना किंवा त्यांच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मेला काय आणि दुष्काळ मग तो कोरडा असो की ओला तो पडला काय त्यांना काही फरक पडत नाही.शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झालेला असताना भूमीपुत्रांची अजूनही एकही ही बातमी नाही की त्यांनी शासनाशी या संदर्भात पत्र व्यवहार केला.बातम्या फक्त उद्दघटनांच्या, भूमीपूजनाच्याच प्रकाशित होत आहेत.भूमिपुत्र सपत्नीक भूमी पूजनांचा आस्वाद घेत असताना शेतकरी राजावर मात्र कोरड्या दुष्काळाचे संकट आले आहे. तालुक्याचे आमदार म्हणून या संदर्भात कोणतीही ठोस पाऊले अद्याप पर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

नुकतेच गांधली ता अमळनेर येथील तरुणांनी जिवंत माणसाची प्रेत यात्रा काढत प्रशासन आणि लोक प्रतिनिधींचे लक्ष ह्या विषयाकडे वेधण्याचा चांगला प्रयत्न केला. तालुक्यात 110.5 MM पावसाची नोंद झाली आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.

सुरुवातीला राज्या बरोबरच अमळनेर तालुक्यात पावसाला चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा निर्माण होऊन पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण नंतर पावसाने जी दडी मारली आहे. ती आजतागायत … सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली होती. मात्र, मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

तालुक्यात सध्या 50 ते 70 टक्के पेरण्या झाल्या असून आता बळी राजाला पावसाची प्रतीक्षा आहे.की जेणे करून दुबार पेरणी करावी लागणार नाही. जुलै महीना संपत आला आहे. आणि तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे.

जून महिन्यात 30% पेरण्या झाल्या आहेत.तर जुलै महिन्यात 80% पेरण्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी केल्या.पूर्व हंगामी कापसाची लागवड असून काही शेतकऱ्यांनी मका, उडीद, मूग व सोयाबीन लागवड देखील सुरू केली होती. आता पाऊस नसल्याने सोयाबीन, मूग व उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तिबार पेरणीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

पिके करपण्याच्या मार्गावर

येत्या काही दिवसात उडीद देखील जळून जाईल की काय अशी भिती निर्माण झाली आहे.

अमळनेर तालुक्यात 50% पाऊस कमी झाला असून दररोज दुपारपर्यंत उन्हाचा तडका देत आकाशात जमणारे ढग सायंकाळी हुलकावणी देत आहे.72% पेरण्या वाया जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमळनेर तालुक्यात जूनअखेरपर्यंत 50 टक्के पाऊस कमी असल्याने काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. तर अनेक तालुक्यात पेरण्या आटोपून पिकांचा अंकूर वर आले आहेत. मात्र पाऊस नसल्याने पिके सुकत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

या खरिपात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली असून कोरडा दुष्काळ आहे. ओला असो का कोरडा तो दुष्काळच असतो. कोकणसह बाधीत जिल्ह्यांना मदतीचा ओघ सुरू आहे ही चांगली व माणुसकीची गोष्ट आहे. मात्र, आमचा तालुका सुद्धा हल्ली कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करत आहोत. कोकणवासीयांएवढीच आमचीही होरपळ झालेली आहे. मात्र आमच्या मागील जखमांवर अजून मलम लावण्यात आले नाही त्यात आता नव्या ताज्या जखमा झाल्या आहेत.

रवींद्र काशीनाथ पाटील रा अमळगाव ता अमळनेर

सध्या अमळगाव,गांधली,पिळोदे, मारवड ह्या सह संपूर्ण तालुक्यात पाऊस नसल्याने आधीच कोरोना त्यात पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.तथाकथित भूमिपुत्र अनिल पाटील यांचा राजकीय उदय हा अमळगाव गटातूनच झालेला आहे. त्यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील या सुद्धा याच कळमसरे, मारवड गटाचे नेतृत्व करतात. याच गावातील शेतकरी अत्यन्त वाईट स्थितीत असताना शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे जर अनिल पाटील जर दुर्लक्ष करत असतील तर ही गावे तुमचा राजकीय बाजार उठवल्या शिवाय राहणार नाहीत, हे तुम्ही आत्ताच कुठेतरी कोरून ठेवा म्हणजे लक्षात राहील.

तर यंदा पावसाचाच पत्ता नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे. मात्र आमचे भूमिपुत्र सपत्नीक गावोगावी उद्घाटन, भूमिपूजन करत हिंडण्यात आणि प्रसिद्धी माध्यमातून आपले फोटो छापून आणण्ण्यात धन्यता मानत आहेत. कोरडा दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी मग ते तोंड कधी उघडणार, शब्द कधी खर्ची पाडणार, आणि आम्हाला दिलासाा कधी मिळवून देणार असा प्रश्‍न अमळनेर मतदारसंघवासींच्या पुढे उभा ठाकला आहे.

Amalner Rainfall
30 July 2021

Amalner – 0.0 mm
Shirud- 0.0 mm
Patonda – 0.0 mm
Marvad – 0.0 mm
Nagaon – 0.0 mm
Amalgaon- 0.0 mm
Bharvas – 0.0 mm
Vavde – 0.0 mm
Total – 0.0 mm
Days Average- 0.0 mm

progressive – 110.05 mm

Amalner Rainfall
31 July 2020

Amalner – 1.0 mm
Shirud- 0.0 mm
Patonda – 0.0 mm
Marvad – 4.0 mm
Nagaon – 0.0 mm
Amalgaon- 0.0 mm
Bharvas – 0.0 mm
Vavde – 0.0 mm
Total – 5.0 mm
Days Average- 0.63 mm

progressive – 469.36 mm

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button