Maharashtra

शॉक लागून कळमसरे येथे शेतकऱ्याचा मृत्यू..मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शॉक लागून कळमसरे येथे शेतकऱ्याचा मृत्यू..मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल २९ जुलै रोजी घडली आहे.
कळमसरे येथील दिलीप मगण न्हावी हे काल दि. २९ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गुरांना पाणी पाजण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर चालू करत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्याने आजूबाजूचे शेतकरी त्याच्याकडे गेले असता विजेच्या धक्क्याने ते फेकले गेले होते. त्यांना खाजगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते मयत असल्याचे घोषित केले. यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button