Bodwad

शेतकरी वर्गाला शांतपणे झोप घेण्यासाठी शिक्षकाने बनविला जुगाड

शेतकरी वर्गाला शांतपणे झोप घेण्यासाठी शिक्षकाने बनविला जुगाड

जितेंद्र गायकवाड

बोदवड,दि.२९ जून :-जळगाव जिल्ह्यातील साळशीगी येथिल गणेश रघुनाथ धांडे या शिक्षकाने जो शेतकरी रात्र व दिवस शेतात राबवून मोठ्या जोमाने पीक तयार करतो परंतु खूप प्रयत्न सुद्धा अचानक एखाद्या रात्री वन्यजीव संपूर्ण पिकांची नासाडी करतात त्यावर पर्याय म्हणून योग्य संशोधन केले व शेतकरी वर्गासाठी एक आशेची किरण शोधली. सरा कडे 5 एकर लिबु फळ बाग आहे तसेच कांदे,कपासी,तूर,असे पीक सर शेतात घेतात. रात्री च्या वेळी वन्यजीवांपासून त्यात रोहीटे ,रानडुक्कर, हरीण ,पासून खूप त्रास होत होता.त्यासाठी त्यांनी संशोधक वृत्तीने युक्ती लढवून अगदी कमी खर्चात हे यंत्र (तोफ ) तयार केली आहे.या जुगडासाठी दोन इंच व अडीच इंच दोन फूट पीव्हीसी पाईप, रेडीसर, बूच आणि लायटर तसेच कार्पेट चे तुकडे व गॅस निर्मिती साठी थोड पाणी, याप्रमाणे जुगाड घेतले व पुढील कृति केली दोन्ही पाईप जुळवून घेतले.मागच्या बाजूला लायटर लावला,पुढे एक छोटे छिद्र पाडले त्या छिद्रातून कार्पेट चे तुकडे टाकले व गॅस तयार होण्यासाठी थोडे पाणी टाकले लायटर ने पेटवला की मोठा आवाज होतो. कुठली ही इजा होत नाही त्या आवाजामुळे रानडूक्कर,रोहीटे, हरीण पळून जातात अगदी कमी खर्चात ही घरगूती तोफ तयार होते तसेच त्याच प्रमाणे कुठलेही वायू प्रदूषण होत नाही आणि एवढेच नाही तर मुल दिवाळीत पैसे न खर्च करता याचाच फटाके म्हणून आनंद घेवू शकतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button