Walchandnagar

बालआनंद मेळाव्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद

बालआनंद मेळाव्याला ग्रामस्थांचा प्रतिसाद

अमोल राजपूत

वालचंदनगर : (इंदापूर तालुक) वालचंदनगर मधील प्राथमिक शिक्षण विभागाच्या वालचंदनगर पाठशाळा क्रमांक ३( पोस्ट काॅलनी ) मध्ये मंगळवारी सह शालेय उपक्रम अंतर्गत आठवडे आनंदी बाजार व कलाकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराची माहिती तसेच पैशाची देवाण घेवाण करता यावी यासाठी १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. बालचमूंचा आनंदीबाजाराचे उद्घाटन वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे आनंद नगरकर च्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे शाळेच्या मुख्याध्यापिका विजया वाघमारे ,वालचंदनगर कंपनीमधील अधिकारी राहूल माने ,मिश्रा , शैलेश फडतरे, यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहित केले. या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांनी पोहे , वडापाव, ओली भेळ , समोसा, चाॅकलेट, चिक्की, अश्या विविध खाद्य पदार्थाचे स्टाॅल तसेच भेंडी, वांगी , शेवगा , कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, शेपू , मेथी , इत्यादी पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. तसेच कलाकृती प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध हस्तेकलेच्या वस्तू तयार करून आणल्या. त्यामुळे मुलांच्या उपजत गुणांना वाव मिळतो. या बाजारात ३० ते ३५ हजाराची उलाढाल झाली. पालकांनी परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला . शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे सर्व शिक्षक , विद्यार्थ्यांचे , पालकाचे कौतुक केले. यावेळी वंदना सांगळे , दिपा शिवगुंडे , जयश्री निकम , मनिषा व्यवहारे, कीर्ती वाघमारे, भाग्यलता पाटमास , हणमंत पाटील, दिपक खरात, संतोष देवरे , राहूल खरात , इत्यादी सर्व उपस्थित होते.

1)उदघाटन करत असताना वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे अधिकारी आनंद नगरकर अनेक मान्यवर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button