Rawer

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविणारे पोलीस दादा निलेश लोहार यांचा रावेर पोलीस ठाण्यात निरोप समारंभ.

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविणारे पोलीस दादा निलेश लोहार यांचा रावेर पोलीस ठाण्यात निरोप समारंभ.

संदिप कोळी
रावेर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार निलेश लोहार यांचा एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप समारंभ करण्यात आला यावेळी त्यांचा सत्कार पो.नि. कैलास नागरे साहेब यांनी केला तसेच रनर ग्रुपचे विजय पाटील सर,गुलाब वाडी चे पुरस्कार प्राप्त गवळी सर,दक्षता समितीच्या वतीने महिला सदस्य बोहरा मॅडम व त्यांच्या सहकारी महिला, निंभोरा येथून आलेले महाराष्ट्र पोलीस मित्र समिती सदस्य पोलीस मित्र परमानंद शेलोडे, विकी दरयाने,पल्लव नेहते यांनी केला विशेष म्हणजे रावेर कोर्ट चे न्यायदंडाधिकारी श्री.अनंत बाजड साहेब यांनी श्री लोहार यांना कोर्टात बोलवून त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक स. पो . नि. शितल कुमार नाईक साहेब यांनी केले लोहार यांच्या पोलीस सेवेच्या कार्याबद्दल पो.नि. कैलास नागरे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विजय पाटील सर, गुलाब वाडी चे गवळी सर, बोहरा मॅडम यांनी पण मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी निलेश लोहार यांना आनंदाश्रू येऊन त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे व पोलीस स्टॉप चे आभार व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले या कार्यक्रमाला समस्त पोलीस स्टाफ व त्यांच्यावर प्रेम करणारे मंडळी महिला कार्यकर्त्या तसेच पो.उप.नि. मनोहर जाधव साहेब पो.उप .नि. विशाल सोनवणे व पत्रकार बांधव हे पण उपस्थित होते आभार प्रदर्शन स. पो.नि. शितल कुमार नाईक साहेब यांनी केले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button