Amalner

?️अमळनेर कट्टा….Breaking…पोलीस वसाहतीतील पोलीस बांधवाचे राहत्या घराचे छत कोसळले..!सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही..!निकृष्ठ कामाचा प्रत्यय..! पोलिसांचे जीवन धोक्यात..!

?️अमळनेर कट्टा….पोलीस वसाहतीतील पोलीस बांधवाचे राहत्या घराचे छत कोसळले..!सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही..!निकृष्ठ कामाचा प्रत्यय..! पोलिसांचे जीवन धोक्यात..!
अमळनेर येथील ढेकू रोडवरील पोलीस ठाण्या जवळ पोलीस वसाहत बांधण्यात आली आहे. ह्या वसाहतीचा शुभारंभ मोठ्या थाटात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते 1 नोव्हेंबर झाला होता.पोलीस लायनीतील जुनी घरे ही पोलीस बांधवासाठी धोकेदायक आहेत ह्या कारणास्तव अमळनेर पोलीस ठाण्या च्या प्रांगणातच पोलीस वसाहत गेल्याच वर्षी उभारण्यात आली आहे. ह्या वसाहतीत पोलीस कॉ सचिन पाटील यांच्या घराचे छत कोसळले असून सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. त्यांची दोन जुळी मुले व पत्नी घरी होते.अचानक आवाज झाल्याने एका सेकंदाच्या फरकात सचिन पाटील यांच्या पत्नीने मुलांना खेचले आणि छत खाली कोसळले आहे.छतावरील पंखा पूर्णपणे वाकला असून ही धक्कादायक घटना आज पोलीस वसाहतीत घडली आहे.ही वसाहत विविध कारणांसाठी नेहमी वादात राहिली आहे.यामुळे ह्या बांधकामाच्या दर्जेदार पणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ज्या वेगात ही संपूर्ण वसाहत निर्माण करण्यात आली होती त्याच वेळी ह्या कामा संदर्भात शंका निर्माण झाली होती. आणि आज त्याचा प्रत्यय आला आहे. पोलीस बांधव हे अहोरात्र घरा बाहेर असतात आणि त्यांचे कुटुंब घरी असते.अश्या वेळी त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.ह्या कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदारावर त्वरित कार्यवाही होणे आवश्यक आहे.
?️अमळनेर कट्टा....Breaking...पोलीस वसाहतीतील पोलीस बांधवाचे राहत्या घराचे छत कोसळले..!सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही..!निकृष्ठ कामाचा प्रत्यय..! पोलिसांचे जीवन धोक्यात..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button