Pandharpur

फॅबटेक मधील विद्यार्थ्यास मिळाले ७ लाखाचे वार्षिक पॅकेज

फॅबटेक मधील विद्यार्थ्यास मिळाले ७ लाखाचे वार्षिक पॅकेज

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला : कॅम्पस प्लेसमेंट बाबतीत अग्रेसर असणाऱ्या फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील सुनील सोलनकर या विद्यार्थ्यांची असेंचर या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये निवड झाली असून त्याला वार्षिक ७ लाख रुप्याचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे यांनी दिली.
असेंचर हि आयटी सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी असून हि कंपनी सिक्युरिटी टेस्टिंग, मोबाईल अँड क्लाऊड अँप्लिकेशन टेस्टिंग सह सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित होण्यासाठी कॉलेजने राबविलेल्या विविध टेक्निकल ट्रेनिंग चा फायदा होत असल्याचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ .साहेबागौडा संगनगौडर यांनी सांगितले.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपन्यांमध्ये निवड करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले. निवड झालेल्या या विद्यार्थ्याचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर , संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, अकॅडेमिक डीन प्रा . तात्यासाहेब जगताप ,इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेली कम्युनिकेशन चे विभागप्रमुख प्राध्यपिका धनश्री राऊत , सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button