Pandharpur

फॅबटेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावरील वेबिनार संपन्न

फॅबटेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावरील वेबिनार संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला : येथील फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमधील कॉम्प्युटर विभाग व अनअकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इंजिनिअरिंग नंतरच्या करिअर संधी या विषयावरील वेबिनार यशस्वी रित्या पार पडल्याची माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
या वेबिनारमध्ये अनअकॅडेमीचे स्टार एजुकेटर गेट फोरम पुरस्काराने सन्मानित असणारे प्राध्यापक नवलक प्रकाश यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी गेट परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. तसेच इंजिनिअरिंग नंतर असणाऱ्या खाजगी, सरकारी, निमसरकारी क्षेत्रातील करियरच्या संधी व उच्च शिक्षणाच्या संधी यावर मार्गदर्शन केले. अशी माहिती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे यांनी दिली.

या कार्यक्रमास सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन व मेकॅनिकल विभातील एकूण २७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा.मिलन शेटके यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभाग प्रमुख, अधिष्ठाता व प्राचार्य यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button