Nashik

शाळाबाह्य़ विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी.- तहसिलदार किशोर मराठे.

शाळाबाह्य़ विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी.- तहसिलदार किशोर
मराठे.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : सुरगाणा तहसिल कार्यालयात शासनाकडून मिळणा-या अनुदान देयकावर बावीस वर्षीय युवक जेव्हा कागदावर सही ऐवजी अंगठा टेकवतो हि तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख दर्शविणारी अंत्यत दुर्दैवी बाब असून यापुढेही भविष्यात असे होऊ नये याकरिता शिक्षणाच्या प्रवाहातून कोणीही सुटता कामा नये या करीता सर्वेक्षणात कोणीही खोटी आकडे देऊ नयेत अशी खंत तहसिलदार किशोर मराठे यांनी व्यक्त केली. याच करीत
शाळाबाह्य़ विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन तहसिलदार किशोर मराठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत केले. या बैठकीस विशेष शोध मोहीम समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार किशोर मराठे, सहअध्यक्ष
गटविकास अधिकारी भावसार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस.आर. भिंगारे, वरिष्ठ अधिव्याखाता योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे, तालुका बालरक्षक प्रतिनिधी शिक्षक रतन चौधरी, सदस्य सचिव गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर,
शासकीय कामगार अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी मराठे म्हणाले की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक ते दहा मार्च या दरम्यान सहा ते चौदा वयोगटातील अद्यापही शिक्षणाच्या प्रवाहात न आलेली स्थलांतरीत शाळाबाह्य़ मुले यांचे घरोघरी,वाडी वस्ती, ऊसतोड कामगार, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजूर, कष्टकरी, कांदाचाळ, द्राक्षबागेत काम, बांधकाम व्यवसाय, जिनींग मील या प्रकारच्या कामासाठी स्थलांतरित सहा ते चौदा वयोगटातील मुलांचे अचुक सर्वेक्षण करुन शाळेत दाखल करुन शिक्षणाच्या प्रवाहात आणावीत कोविड-19 प्रादुर्भावामुळे शाळाबंद असल्याने शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर बालकांचे शिक्षण सुरु रहावे तसेच शाळाबाह्य़ मुले राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गावपातळीवर शिक्षक, सरपंच, शालेय व्यवस्यापन समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, शिक्षण तज्ञ, स्वयंसेवी संस्था, बालरक्षक शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक यांनी मोहीम यशस्वीपणे राबवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी कोळी यांनी तालुक्यातील सद्यस्थितीचा शैक्षणिक
आढावा बैठकीत विशद केला. जिल्हा प्रशिक्षण परिषदेचे अधिव्याखाता सोनवणे यांनी सांगितले की, शिक्षण हमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून 83 व्या घटनादुरुतीने बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला मिळालेला आहे. भावी पिढी जगली पाहीजे तसेच शिकून सुसंस्कारीत होऊन देशाचे जबाबदार भावी नागरिक तयार झाले तरच देशाची प्रगती शक्य आहे. मोफत पुस्तके, शालेय पोषण आहार, मोफत
गणवेश वाटप, उपस्थिति भत्ता, सुवर्णा महोत्सवी शिष्यवृती योजना, प्रवास भता, दिव्यांग भत्ता अशा विविध शासनाच्या योजनांचा लाभ गरजू पर्यंत पोचवून भविष्यातील निष्पाप कळ्या कोमजू नयेत याकरीता समाजातील प्रत्येक व्यक्तिने योगदान दिल्यास मोहिम यशस्वी होईल असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button