Nashik

स्वराज्याच्या शिलेदारांची दुर्लक्षित देहरे किल्यांवर मोहीम

स्वराज्याच्या शिलेदारांची दुर्लक्षित देहरे किल्यांवर मोहीम

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिकपासुन हाकेच्या अंतरावर असलेला रामशेजचा पाठीराखा आणि त्याच बरोबर भोरगडाचा सोबती म्हणुन इतिहासात ओळख असलेला देहेरे किल्ला सद्यस्थितीत एकदम पडद्याआड आणि दुर्लक्षीत झालेला दिसतोय.अत्यंत घनदाट झुडपांमध्ये आणि गवतामध्ये अनेक पुरातन अवशेष गाडले गेल्याचे दिसते .अत्यंत आखिवरेखीव कोरीव पायर्‍या असलेला हा किल्ला.भक्कम भुरुज असलेल्या कमानीदार दोन प्रवेश द्वारांच्या संरक्षनात होता हे जानवते,किल्यांवर अनेक पाण्याचे टाके,शिवमंदीर,पुरातन अवशेष,तटबंदी,बुरुजं अशा अनेक पुरातन वास्तु आहेत.
स्वराज्य संवर्धन संस्थेने किल्यावर रविवार दि.२६/९/२०२१रोजि मोहीम घेऊन उघड्यावर असलेल्या महादेव व परीसराची स्वच्छता करुन बिल्ववृक्षाचे रोपण करुण येत्याकाळात वनविभाग आणि पुरातत्वविभागाच्या संघनमताने योग्य ती माहीती घेऊन संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला.संस्थेने आजपर्यंत अनेक किंल्यांवर संवर्धन वृक्षारोपण आणि बिजारोपनाच्या मोहीमा घेऊन पुरातन ठेवा प्रकाशमान करण्याचा व जंगलसंपत्तेत भर घालनाचे काम केले.त्याच प्रमाने नाशिकजवळील देहरे किल्ला पण पर्यटनाच्या दृष्टिने मैलाचा दगड ठरु शकतो,म्हनुण त्याचे जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे.त्यासाठी संस्था यथोचित प्रयत्न करनार आहे.
मोहीमेत भाऊसाहेब चव्हाणके,सोमनाथ मुठाळ,भाऊसाहेब कुमावत,प्रविन भेरे, अमोल शिरसाठ मनोज सोमवंशी,अविनाश ठाकरे,ओंकार मुठाळ,रुद्राक्ष चव्हाणके आदी सामिल झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button