Pune

भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडला उस्फुर्त प्रतिसाद

भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडला उस्फुर्त प्रतिसाद

दत्ता पारेकर पुणे

पुणे : राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिगवण सायकल क्लब, इंदापूर सायकल क्लब आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने FIT INDIA व SAVE NATURE या उपक्रमांतर्गत शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी 150 पेक्षा जास्त सायकल प्रेमींनी भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडच्या माध्यमातून 58 किलोमीटर सायकलिंग करून इंदापूर महाविद्यालयातील ऑक्सीजन पार्कमध्ये 58 बेलाच्या रोपांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. 5800 बेल व देशी रोपांचे आय कॉलेजने वाटप केलेआहे.
हर्षवर्धन पाटील यांनी या रॅलीत सहभागी होत पुणे बायपास रोडवरील मालोजीराजे चौक येथून सायकलिंग करत इंदापूर महाविद्यालयापर्यंत सायकल प्रवास केला. या सायकल रॅलीमध्ये लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी या सायकल रॅलीत सहभागी होत हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचा आनंद द्वीगुणित करीत फिट इंडिया व सेव नेचर चा संदेश देत कोरोना पार्श्वभूमीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून संदेश दिला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ सायकल क्लबच्या माध्यमातून सायकल प्रेमींनी सायकल राईड व वृक्षसंवर्धनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल असा हा उपक्रम आहे. कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती तयार करावी लागणार आहे तसेच ती वाढवावी लागणार आहे. असंख्य तरुण, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक इंदापूर तालुक्यामध्ये सायकलिंग करत आहेत यातून सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे. देशी व बेलाच्या रोपांच्या माध्यमातून ऑक्सीजन पार्क तयार केला जात आहे. सर्वांनी यातून प्रेरणा घेऊन सायकल क्लब वाढवला पाहिजे. प्रत्येक गावागावात महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनासाठीचा प्रयत्न झाला पाहिजे.’
भिगवन सायकल क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे, माजी रोटरी अध्यक्ष रियाज शेख, इंदापूर सायकल क्लबचे अध्यक्ष सुनील मोहिते, कु. गौरी सातारले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
वृक्षारोपनानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सायकल रॅलीतील सहभागी युवक-युवतींना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सायकल प्रेमींनी हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगरसेवक शेखर पाटील, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, भिगवन सायकल क्लबचे उपाध्यक्ष अर्जून तोडकर, सचिव अल्ताफ शेख तसेच संपत बंडगर, केशव भापकर, रियाज शेख, संजय चौधरी, अनिल काळे, संजय खाडे, दिनेश मारणे, अवधूत पाटील, प्रवीण वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. या उपक्रमाची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. यापूर्वी इंदापूर महाविद्यालयाने इंदापूर ते राजगड असा सायकल प्रवास केल्याचे सांगून 1 सप्टेंबर पासून आय कॉलेज सायकल क्लब स्थापन करणार असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी बारामती ते इंदापूर असा सायकल प्रवास केला त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार डॉ. शिवाजी वीर यांनी मानले.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचा जयघोष करीत सायकल प्रेमी तरुणांनी इंदापूर शहरातील वातावरण उत्साही केले होते आणि एक वेगळाच असा अनुभव आज इंदापूरकरांनी यावेळी अनुभवला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button