Amalner

आम्ही जरी वयाने वयस्कर असलो तरी मनाने व कष्ट करण्यासाठी तरूण आहोत हि कहानी नसून खरी वस्तूस्थिती आहे वाचली तर समजेल

आम्ही जरी वयाने वयस्कर असलो तरी मनाने व कष्ट करण्यासाठी तरूण आहोत हि कहानी नसून खरी वस्तूस्थिती आहे वाचली तर समजेल

अमळनेर : सरबेटे खू गावामध्ये 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड करणेचे काम सूरू होते बिहार पॅटर्न शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून 5500 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यासाठी गावामध्ये पहिल्यांदा काम करण्यासाठी पुढे कोणीच येत नव्हते यातून कशा पद्धतीने मार्ग निघायचा हे कुणालाच समजत नव्हते गावामध्ये अनेक गावामध्ये तालूक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षरोपन सूरू होते.

सारबेटे खू गावामध्ये ही कामाची तयारी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू होती या बिहार पॅटर्न वृक्ष लागवड संदर्भात पाणी फाउंडेशन तसेच शासन पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या टीम च्या माध्यमातून गेले वर्ष-दीड वर्ष अनेक मीटिंग यांच्या माध्यमातून माहिती दिली जात होती तशिच मिहिती सारबेटे खू गावातही दिली गेली होती पण गावातिल सर्व लोक माहिती एकून घेणार पण पुढे काम काय करणार नाहीत सुरवात कूनी करायची यातच पडले होते अशातच सारबेटे गावातील वयाने थोडे वयस्कर पण अंगामध्ये कष्ट करण्याची खूप मोठी धमक व जिद्द असणारे राजेंद्र पाटील धर्मेंद्र पाटील व किसन पाटील या तिघांना वृक्ष लागवडी संदर्भात संदर्भात माहिती मिळताच हे तिघे पहिले गावातून टीकम फावडे घेऊन गावामध्ये पहिले काम करण्यासाठी पुढे आले व या तिघानी वृक्ष लागवडीेसाठी खड्डे करण्याचे काम सुरू केले.

 

या तीन ध्येयवेड्या वयाने जास्त असणाऱ्या पण मनाने तरुण असणाऱ्या वडीलधार्‍या खड्डेखननेचे काम पूर्ण केले त्याचे हे काम पाहून अनेक गावकऱ्यांनी खड्डे खणण्याचे काम सुरू केले या तिघांचे काम पाहून गावातील अनेक युवक महिला काम करण्यासाठी पुढे धावून आले व या तिन व्यक्ती मुळे एक दोन नाही तर तब्बल 100 लोक बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पूढे आले व खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले त्यानंतर गावामध्ये एक वेगळंच वातावरण बिहार पॅटर्न वृक्ष लागवडी संदर्भात निर्माण झाले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष आणण्याचा पूर्ण खर्च करण्यात आला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून व पंचायत समितीच्या प्रयत्नातून सर्व वृक्ष मोफत मिळाले पण पूढे काय झाल वृक्षांची भरून आलेली गाडी गावांमध्ये येताच गावातील राजेंद्र पाटील धर्मेंद्र पाटील व किसन पाटील यांना पहिल्या भरून आलेल्या गाडीतील रोपे वृक्ष रोपण करण्यासाठी एक ही वृक्ष मिळालच नाही.

तशाच पद्धतीने गावांमध्ये दुसरी वृक्षांची गाडी भरून आली तेव्हा देखील इतर लोकांनीच आपआपल्या वृक्षांची वृक्ष लागवड केली त्या गाडीमधील वृक्ष वृक्ष रोपण करण्यासाठी या तिघांना रोपे मिळालीच नाहीत त्यानंतर तिसरी गाडी वृक्षांची भरून गावामध्ये आली तेव्हा देखील या तिघांना वृक्ष मिळतील का नाही याची शाश्वती नव्हती पण इतर सर्व लोकांचे 5300वृक्षाचे वृक्षारोपण करून झाले ते गावातील 5300 रोपांचे वृक्षारोपण 15 ,16 , 17 तारखेला पूर्ण झाले त्यानंतर राहिलेली 200 वृक्ष राजेंद्र पाटील धर्मेंद्र पाटील व किसन पाटील या वयाने जास्त असणाऱ्या पण मनाने तरुण असणाऱ्या तिघांनी जिद्द सोडली नाही आपण वृक्ष लागवड करायची याचा जणू चंगच बांधला होता अशातच गावामध्येच नाही तर तालुक्यात जिल्ह्यात देखील पाऊस कुठेही खूप दिवस पडत नव्हता पण अचानक 17 तारखेला गावात तसेच तालुक्यात जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली मग या तीन ध्येयवेड्या वृक्ष प्रेमी मिञांनी मिळून 18 ऑगस्टला सकाळी खूप पाऊस पडत असताना वृक्षरोपण करण्याचा निश्चय केला होता उभ्या पावसामध्ये हे वयाने वयस्कर असणारे पण मनाने तरुण असणारे ध्येय वेडे तिन वृक्षमित्र तरुण उभ्या पावसामध्ये काम करत होते व त्या तिघांना प्रत्यक्ष वृक्ष लागवड पहाणी करणेसाठी मी सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक व गावकरी गेलो असता मी या तिघांना पाहील मी विचारले एवढ्या पावसामध्ये व एवढ्या उशिरा तुम्ही का वृक्ष लागवड करत आहात तर त्यांनी मला ही सर्व वस्तुस्थिती सांगितली.

माझं मन अगदी भारावून गेलं होतं अगदी अभ्या पावसामध्ये तिघेतरूण मिञ अक्षरक्षा ओले चिंब शरीर भिजले असताना हवेमध्ये गारटा खूप असतानाही तरी पण हे तिघे ध्येय वेडे वृक्षमित्र वृक्षारोपण करतच होते या तिघांनी आखेर आज अापले वाटनीचे सर्व वृक्षाचे रोपन केले या तीन ध्येयवेड्या वृक्षमिञांना पाणी फाउंडेशन चा सलाम हा आहे अंमळनेर चा खरा मैत्री वृक्षलागवड पॅटर्न..

संबंधित लेख

Back to top button