Maharashtra

बँक बुडाली तरी पैसे परत मिळणार… केंद्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

बँक बुडाली तरी पैसे परत मिळणार… केंद्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. अनेक बँक बुडाल्या आणि ठेवीदार हवालदिल झालेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला. त्यामुळे बँक खाते धारकांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. काही महिन्यांपूर्वी PMC Bank, Yes Bank या आणि अशा अनेक बँका डबघाईला आल्या.

त्यामुळे खातेधारकांना त्यांच्याच खात्यातील पैसे काढण्यावर निर्बंध आले. अडचणीत बचत केलेल्या पैशांचा वापर करता यावा, यासाठी अनेक जण बँकेत पैसे जमा करतात. पण बँक बुडीत निघाल्याने किंवा अन्य कारणांमुळे निर्बंध येतात. त्यामुळे बँकांबाबत ग्राहकांमध्ये आता असुरक्षितेची भावना वाढीस लागली आहे.

पण केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता खातेधारकांना आपल्या ठेवींबाबत संरक्षण म्हणून या पूर्वी एक लाखाच्या ठेवींना संरक्षण होते ते आता पाच लाख रुपये करण्यात आले आहे.
एखादी बँक आर्थिक अडचणीत आली असेल तर ठेवींबाबत घाबण्याचे कारण नाही, बुडाली तरी ठेवीदारांना 90 दिवसांत ठेवी मिळणार. यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात असलेल्या बँकेच्या ठेवीदारांना – खातेधारकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी 90 दिवसांत परत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार बँकेतील ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. हा कालावधी निश्चित करण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक होती. तसे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात आणले जाणार आहे.

प्रस्तावित बदलामुळे बँकेत सध्या असलेल्या एकूण ठेवींपैकी 98.3 टक्के मुदत ठेव खात्यांना संरक्षण मिळेल. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे संरक्षण केवळ 80 टक्क्यांपर्यंत आहे. नव्या प्रक्रियेनुसार बँक आर्थिक संकटात गेल्याचे जाहीर झाल्यापासून 45 दिवसांत दाव्याची पूर्तता केली जाईल. त्यानंतर विमा कंपनीची प्रक्रिया होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button