Gondiya

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठिण-इंजि.ढोबळे

राजेश सोनुने

गोंदिया,दि.१९ : भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत या प्रवर्गाला मागावसर्गीय असा दर्जा दिला. मात्र आजपर्यंतच्या प्रत्येक सरकारांनी ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार बहाल करण्याकरिता प्रयत्न केले नाही. जेव्हा – जेव्हा या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दाबण्याकरिता प्रयत्न केले. ओबीसी समाज हा भोळा आहे. हा समाज आता जागृत होत आहे. आता या समाजातील नागरिकांना आपले अधिकार कशामुळे मिळू शकले नाही, हे त्यांना कळले आहे. जेव्हा पर्यंत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी समोर येत नाही, तेव्हापर्यंत या समाजाला आपले अधिकार मिळणार नाहीत. ओबीसी प्रवर्ग देशात ६० टक्क्यांच्यावर आहे. आम्ही निवडून देतो त्या प्रतिनिधींनी आणि सरकारने आता ओबीसींचा अंत पाहू नये. आता आंदोलन म्हणजे दानपेटी झाली असून आमच्याकरिता मतदान म्हणजे मंदीर झाले आहे. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहिल आणि कायदेही आमचेच चालतील. यापुढे नेतेमंडळी आणि सरकारांने ओबीसींच्या हिताचे बोलले तरच त्यांचेही हित आहे, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी मांडले.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासूनु जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप आज(दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी येथील प्रशासकीय भवनासमोर करण्यात आला. दरम्यान जात निहाय जनगणना व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येत आलेल्या ओबीसी समाज बांधवांनी भव्य रॅली काढून शासन विरोधात एल्गार पुकारला.त्यावेळी इंजि.ढोबळे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, मार्गदर्शक ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोबळे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. अतिथी म्हणून सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. एम. करमकर,अमर वराडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,सभांजी बिग्रेडचे क्रांती ब्राम्हणकर,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,आपचे पुरुषोत्तम मोदी, पुष्पा खोटेले,कैलास भेलावे, माजी जि.प. सभापती वाय.टी.कटरे, वाय. टी. कटरे, एस. यू. वंजारी, सुनील भरणे,सविंधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, निलम हलमारे,राजेश चांदेवार,राधेलाल पटले,जिवन लंजे,अवामे मुस्लीमचे आदी उपस्थित होते.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

इंजि.ढोबळे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी लढलेली स्वातंत्र्याची लढाई राजकीय होती. त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्या लढ्यात सर्वात अधिका ओबीसी प्रवर्ग होता. मात्र या प्रवर्गाला अद्यापही सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गाला न्याय द्यावयाचा असेल तर सर्वात आधी न्यायव्यवस्थेत या प्रवर्गांचे प्रतिनिधी जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी समाजाला अद्याप त्यांचे अधिकार का मिळाले नाहीत. जनगणनेचे फायदे, अन्याय कुणामुळे आणि कशामुळे झाला यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले. संचालन मनोज मेंढे, सुनील पटले यांनी केले. आभार राजीव ठकरेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या आधी सुमारे ५०० दुचाकी आणि २० चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. यशस्वितेकरिता शिशीर कटरे, लक्ष्मण नागपुरे, गणेश बरडे, विलास चव्हाण, सावन डोये,महेंद्र बिसेन, कैलाश भेलावे,पप्पू पटले, सी. पी. बिसेन, विजय फुंडे, आनंदराव कृपाण, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, कमल हटवार, हरीष ब्राम्हणकर, विनायक येडेवार, दिनेश हुकरे, मनोज डोये, मनोज शरणागत, गुड्डू कटरे, संजीव रहांगडाले, राजू चामट, उद्धव मेहेंदळे, राधेशाम भेंडारकर,भुमेश्वर चव्हाण,गौरव बिसेन,चौकलाल येडे,माधव तरोणे,दादा संग्रामे,शैलेष बहेकार,कृष्णा बहेकार,भुमेश शेंडे,नरेंद्र शिवणकर,सुरेंद्र मेंढे,अमृत शरणागत आदींनी सहकार्य केले.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओबीसींचा रस्त्यावर एल्गार

रॅलीने वेधले लक्ष

यात्रेच्या समारोप प्रसंगी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ओबीसी समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या आधी दुचाकी ½व चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले.
आमदारांनी दिले आश्वासन
कार्यक्रम स्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधींना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यातील गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण समती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्यापही मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहीणार असून जेव्हा केव्हा ओबीसींच्या मागण्यांचा विषय येईल, तेव्हा मी ओबीसींसोबत असल्याचे आश्वासन दिले.

या आहेत मागण्या

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करण्यात यावी, नोकरीत आरक्षण देण्यात यावे, शासकीय नोकरीत एससी, एसटी प्रवर्गातल रिक्त पदे विशेष भरती अभियान राबवुन भरण्यात यावी, खासगी उद्योगात ओबीसी, एसटी, एमटी यांना लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांसारखीच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, एससी, एसटी, शेतक-यांसारख्या ओबीसी शेतक-यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ओबीसी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षण कायद्याची अंमलबजावणी न करणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, संविधानाविरोधी शिक्षण कायदे थांबविण्यात यावे.

Leave a Reply

Back to top button