Pandharpur

नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये संघर्ष समितीची स्थापना

नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये संघर्ष समितीची स्थापना

प्रतिनिधी
रफिक आतार

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी एकत्रित लढा उभा करणार – कॉ डॉ डी एल कराड नाशिक येथे सिटू कामगार भवन येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे अध्यक्ष कॉ,डॉ डी एल कराड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत कामगार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी प्रथमच महाराष्ट्रातील सर्व झेंडा बावटे व विचाराची कामगार संघटना एकत्र येऊन
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघर्ष समिती ची स्थापना करण्यात आली
यामध्ये महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत व प्रश्नांबाबत एकत्रित लढा उभा करून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला याची पूर्वतयारी म्हणून जानेवारी २०२२ मध्ये शिर्डी येथे राज्यव्यापी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवून जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय व मा आयुक्त तथा संचालक वरळी मुंबई व मंत्रालयावर मोर्चे काढण्याबाबत ची तयारी करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद मध्ये व त्याच्या विभागांमध्ये राज्यभर विभागीय मेळावे घेऊन राज्यव्यापीआंदोलन उभा करण्याचा निर्णय या संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती हे राज्याचे अध्यक्ष मा.कॉ.डॉ.डी.एल.कराड जनरल सेक्रेटरी अँड सुनील वाळुजकर पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा ए बी पाटील कोकण विभागाचे व राज्याचे कामगार नेते महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड सुरेश ठाकूर जनरल सेक्रेटरी संतोष पवार अनिल जाधव
महाराष्ट्र राज्य संवर्ग नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी. पी. शिंदे. भारतीय मजदूर संघाचे राज्याचे अध्यक्ष राम गोपाल मिश्रा ,भगवान बोडखे.
बी.जी.खाडे. पश्चिम महाराष्ट्राचे कामगार नेते हरीभाऊ माळी.धनंजय पळसुले. कॉ.प्रकाश जाधव.कॉ.सिद्दपा कलशेट्टी. महादेव आदापुरे, उत्तर महाराष्ट्राचे कामगार नेते कॉ.पोपटराव सोनवणे.कॉ.रामदास पगारे.कॉ.राजेंद्र शिंदे.यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटना तसेच इतर नगर परिषद संघटना यांना एकत्रित करून या सर्वांच्या नेतृत्वाखाली व संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला
या झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीस राज्यातील सर्व नगरपरिषद कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
संघटनेचे सर्व कामगार नेते पदाधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कामगार संघटना एकत्रित व्हाव्यात म्हणून कॉ डॉ डी एल कराड, संतोष पवार व अँड सुनील वाळूजकर यांनी पुढाकार घेतला होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button