डोंबिवली

उद्योग अंकुर बिझनेस फोरम व महाराष्ट्र उद्योग असोसिएशनची स्थापना

उद्योग अंकुर बिझनेस फोरम व महाराष्ट्र उद्योग असोसिएशनची स्थापना

डोंबिवली:प्रतिनिधी मिलिंद जाधव
सर्व सामान्यांना रोजगार मिळावा, व्यावसायिकांचा रोजगार वाढावा त्याला गती मिळावी, इतर विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची ओळख व्हावी व त्याद्वारे प्रत्येकाच्या प्राॅडक्सची ओळख माहीती मिळावी,व्यवसायासंदर्भात विचारांची देवाणघेवाण व्हावी, व प्रत्येकाच आर्थिक उत्पन वाढावे या उद्देशाने जनकल्याण सेवा फाऊंडेशनच्या अंतर्गत नुकताच उद्योग अंकुर बिझनेस फोरम व महाराष्ट्र उद्योग असोसिएशनची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी ६० वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणा-या उद्योजकांनी या व्यावसायिक मार्गदर्शन सोहळ्यात सहभाग घेतला. प्रत्येकाने आपले अनुभव व व्यवसायाची व प्रोडक्सची ओळख करुन दिली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विजयजी गावडे व उद्योजक महेशजी यादव हे उपस्थित होते.यांनी व्यवसाय का करावा कसा करावा, आर्थिक उन्नती कशी करावी यातील बारकावे व चिकाटी अशा विविध पैलूंवर महत्वाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांच स्वागत जनकल्याण सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन फळणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.कार्यक्रमाला जनकल्याण सेवा फाऊंडेशन अंतर्गत स्थापन झालेल्या उद्योग अंकुर बिझनेस फोरम व महाराष्ट्र उद्योग असोसिएशनचे अँड .रणधिर सकपाळ,श्रुती उरणकर, अँड .माधुरी जोशी, सुनिता मिश्रा, विजय फळणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उद्योजक कीरण डोंगरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Back to top button