Amalner

धनदाई महाविद्यालयातर्फे खेडी येथे ग्रामवाचन कट्ट्याची स्थापना

धनदाई महाविद्यालयातर्फे खेडी येथे ग्रामवाचन कट्ट्याची स्थापना

अमळनेर : धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेरच्या एनएसएस विभागातर्फे दत्तक ग्राम खेडी खुर्द येथे “कवियत्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टा” ची स्थापना राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त करण्यात आली. राजमुद्रा अभ्यासिकेच्या जागी आयोजित या उपक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रदिप पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून खेडी गावचे पोलीस पाटील निलेश पाटील हे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. राहुल इंगळे यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचन कट्टा बद्दल भूमिका स्पष्ट केली. तसेच स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. एनएसएस विभागातर्फे राजमुद्रा अभ्यासिका यांना स्पर्धा परीक्षेचे 5 ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तसेच ग्राम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी डी पाटील तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ राहुल इंगळे तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा प्रवीण पवार, एन एस एस स्वयंसेवक प्रशांत बोरसे, भावेश पाटील, विशाल वारुळे, जयेश पाटील, नरेंद्र पाटील, समाधान पाटील, प्रणव पाटील, मयूर पाटील, किरण पाटील व प्रशांत पाटील आदींनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button