फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना
प्रतिनिधी
रफिक अत्तार
सांगोला: येथील फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन केल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय आदाटे यांनी दिली .
लोकशाहीच्या भवितव्यासाठी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग व्हावा यासाठी नागरिकत्वाचा विकास होणे ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नवीन मतदार नावनोंदणी आणि मतदान करण्याचा अधिकार या संदर्भात जागृती निर्माण व्हावी या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली असून २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पॉलीटेक्नीक चे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी सांगितले.या निवडणूक साक्षरता मंडळामध्ये नोडल अधिकारी म्हणून मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा .दत्तात्रय नरळे , शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा . अरुण लोखंडे ,प्रा. विश्रांती मराठे , प्रा. वैशाली मिस्कीन व प्रा .शरद पवार व विद्यार्थी प्रमुख म्हणून पवनसुत पवार व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मेकॅनिकल विभागातून प्रथमेश दाभाडे , असिफ पटेल , मयूर आतकर ,अनिल वरकुटे, ऋतुराज पवार , सिव्हिल विभागातून आदित्य ढेरे ,रुपाली कोळेकर, चैतन्य कुंभार, सौरभ कदम, केतन उत्तरे ,अभिषेक काशीद आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून शिंदे समृद्धी ,दीक्षा मेटकरी ,रेश्मा देशमुख , पृथ्वीराज गुरव ,प्रथमेष करांडे , वैष्णवी कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यकारिणी मंडळाची स्थापना फॅबटेक चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.