Nandurbar

रेलूताईच्या सत्काराने महिला विभागाला ऊर्जा – मंत्री यशोमती ठाकूर

रेलूताईच्या सत्काराने महिला विभागाला ऊर्जा – मंत्री यशोमती ठाकूर

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा यासाठी रेलूताई वसावे होडीच्या साह्याने कठीण प्रवास करतात. या नव्या हिरकणीच्या विशेष धाडसाचं आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर रेलूताईंचा सत्कार करून मंत्री महोदयांनी स्वतःच्या जवळच्या खुर्चीवर रेलूताईंना बसवून घेतले. काहीही अडचण आली तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याची सूचनाही केली.

चिमलखेडी परिसरातील पाड्यावर पोषण आहार पोहोचविताना रेलूताईंनी अनेकदा बोटीने प्रवास केला. डोक्यावर पोषण आहार घेऊन डोंगराळ भागातून पायी प्रवासही केला. तिच्या या असामान्य कर्तृत्वामुळे सत्कार करताना केवळ तिलाच नव्हे तर संपूर्ण महिला विभागातील हजारो अंगणवाडी ताईंना यानिमित्ताने ऊर्जा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Back to top button