Paranda

खासगाव येथील स्मशान भुमी व गावठाण च्या जागेत बोगस नोंदी लाऊन अतिक्रमण कारवाई ची मागणी १० दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसिल कार्यालया समोर अंदोलन ग्रामस्थांचा इशारा…

खासगाव येथील स्मशान भुमी व गावठाण च्या जागेत बोगस नोंदी लाऊन अतिक्रमण कारवाई ची मागणी.. १० दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसिल कार्यालया समोर अंदोलन ग्रामस्थांचा इशारा...

सुरेश बागडे परंडा

परंडा : तालूक्यातील खासगाव येथील मशान भुमी व गावठाण च्या जागेत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून बोगस नोंदी लाऊन महादेव लिमकर, व नितीन लिमकर यांनी केलेले अतिक्रमन काढण्यात यावे अन्यथा तहसिल कार्यालया समोर अंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे .

दि १७ जुन रोजी तहसिलदार परंडा व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खासगाव येथील मशान भुमी व गावठाण च्या जागेत नितीन लिमकर, व महादेव लिमकर यांच्या नावाची ग्रामपंचायत मध्ये १० गुठे जागेवर बोगस नोंद लावण्यात आली आहे .

या अतिक्रमना मुळे मशानभुमी साठी अडचण निर्माण झाली आहे

या बेकायदेशीर नोंदीची चौकशी करून दोषी वर कारवाई करावी व अतिक्रमन काढण्यात यावे १० दिवसात कारवाई नाही झाल्यास तहसिल कार्यालया समोर अंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे .
निवेदनावर श्रीमती मंदा पाटील , हनुमंत जगदाळे ,
अरूण सातपुते , अभिषेक रमेश लिम कर, बबन दत्तू लिमकर, भारत थाटे , पोपट , लिमकर , सुधिर लिमकर, भागवत लिमकर, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button