Lonand

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव थाळी योजना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव थाळी योजना

दिलीप वाघमारे

लोणंद शहरात सुरू करावी खंडाळा तालुक्यातील शिवसैनिकांना याचा विसर पडला आहे शिवसैनिकांनी खंडाळा तालुक्यातून आवाज उठवावा याची गरज आहे लोणंद शहरामध्ये गेली अनेक वर्ष युती सरकारच्या काळामध्ये झुणका भाकरी केंद्र स्थापन झाले नुसते सातारा येथे शिव थाळी योजना सुरू झाली परंतु पुणे जिल्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर लोणंद शहर आहे या ठिकाणी एमआयडीसी रेल्वे स्टेशन आणि चार जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र म्हणून दळणवळण वारंवार असते आणि या ठिकाणी सोय शिव थाळी ची गरज आहे सर्वसामान्य बहुजन वर्गासाठी गोरगरीब जनतेला परवडणारी शिव थाळी योजना येथे स्थापन व्हावी याठिकाणी झुणका भाकरी केंद्र आहेत त्याठिकाणी योजना राबवली तर सुसज्ज इमारत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव थाळी योजना

त्याचबरोबर आठवडा बाजार समोर पहिली इमारत व दुसरी इमारत पुणे-सातारा रोडवर स्टेशन चौक येथे आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचा विचार शासनाने करणे गरजेचे आहे महागाईच्या काळामध्ये शंभर रुपयाला एक थाळी गरिबांना न परवडणारी गोष्ट आहे तसेच ज्वारी 40 रुपये किलो माजरी 30 रुपये किलो गहू 30 रुपये किलो या महागाईमुळे कंबरडे गरिबांचे मोडले आहे सर्वसामान्य झोपडपट्टीतील जनता अर्धपोटी उपाशी झोपावे लागते याचे लोकप्रतिनिधी विचार करून शासनापर्यंत व्यथा मांडण्याचा गरज आहे आणि तातडीने या सुविधा राबवणे कामी झोपडपट्टी धारक चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे तरी शिव थाळी तातडीने योजना राबविण्यात यावी अशी मागणी खंडाळा तालुक्यातून होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button