Pune

भिगवण जलाशय परिसरात पर्यटन क्षेत्रात युवकांना रोजगार संधी- हर्षवर्धन पाटील

भिगवण जलाशय परिसरात पर्यटन क्षेत्रात युवकांना रोजगार संधी- हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:पर्यटकांचे विशेषत: पक्षी अभ्यासक, पक्षीप्रेमीसाठी पर्वणी असणाऱ्या भिगवण येथील कुंभारगाव परिसरातील फ्लेमिंगोचे पर्यटन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी आज सकाळी 6 वाजता आपल्या कार्यकर्त्यांसोबत केले.
हिवाळी पर्यटनासाठी उजनी जलाशयाचे भिगवण परिसरातील फ्लेमिंगोचे आकर्षण अनेक देशी व परदेशी पर्यटकांना असते. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भिगवण येथील कुंभारगाव, तक्रारवाडी, डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो वास्तव्यास येत असतात.
पक्षीप्रेमी साठी आकर्षण ठरणाऱ्या उजनी जलाशयाच्या परिसरात चित्रबलाक,पाणघर आणि अन्य अनेक प्रकारचे स्थानिक रंगीबिरंगी पक्षांचे थवे या परिसरात पाहायला मिळतात.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत आज पक्षी पर्यटनाचा आनंद घेतला. उजनी जलाशय परिसर पर्यटनातून रोजगारासाठी युवकांना अधिकाधिक संधी निर्माण करू शकतो असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button