Surgana

बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्ष पदी मोहन गावीत यांची निवड, सुरगाणा तालुका शाखा जाहीर

बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्ष पदी मोहन गावीत यांची निवड, सुरगाणा तालुका शाखा जाहीर
विजय कानडे सुरगाणा
सुरगाणा: मोहन गावीत यांची बिरसा क्रांती दल सुरगाणा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 मे 2021 रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. या सभेत तालुका शाखा सुरगाणा निवड करून जाहीर करण्यात आली.कार्यकारिणीतील सर्व सदस्यांशी चर्चा करून सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी मोहन गावीत यांची निवड करण्यात आली आहे. मोहन गावीत हे माध्यमिक शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आदिवासी समाजाबद्धलची त्यांची काम करण्याची धडपड बघून सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. तालुका शाखा सुरगाणा पुढीलप्रमाणे आहे.
तालुका अध्यक्ष मोहन गावित सर ,उपाध्यक्ष 1)अशोक गायकवाड सर 2)तुळशीराम गावित सर , सचिव: बळवंत पाडवी सर ,कार्याध्यक्ष : भास्कर गायकवाड सर,कोषाध्यक्ष : 1)चुनीलाल घांगळे सर 2)हेमंत चौधरी सर ,सहसचिव: महेंद्र देशमुख सर,सल्लागार : तुकाराम अलबाड सर,महिला प्रतिनिधी :1)सुनंदा गायकवाड मॅडम ,तालुका संघटक: 1)नितीन धूम 2)योगेश भोये,प्रसिद्धी प्रमुख :1) गणेश गायकवाड 2)योगेश वाघमारे, सदस्य 1) दिनेश पवार डी भाई2) गोपाळ गायकवाड3) नारायण चौधरी 4) प्रमोद वाघमारे5) अशोक देशमुख सर 6) हिरामण गायकवाड7) सुनील गुंबाडेयाप्रमाणे तालुका शाखा कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली आहे.
या सभेला सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष, चिंधू आढळ पुणे कार्यकर्ते, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे, मधुकर पाडवी तालुका अध्यक्ष पेठ, दादाजी बागूल कार्याध्यक्ष बागलाण व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.मनोज पावरा यांनी नवनिर्वाचित सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button