Amalner

खा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील

खा शि ची निवडणूक त्वरीत घ्यावी..विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठवावेत..संचालक व माजी आमदार डॉ बी एस पाटील

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक त्वरित घ्यावी व नविन संचालक मंडळ अस्तित्वात येई पर्यंत संस्थेचे दप्तर ताब्यात घेवून कार्यकाळ संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्यात यावे अशी मागणी संचालक डॉ बि एस पाटील यांचेसह ऊपाध्यक्ष व विश्वस्तांनी धर्मदाय आयूक्तांकडे केली आहे दरम्यान संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रील २०२१ मध्येच संपला आहे कोविडच्या पार्श्वभूमिवर अध्यक्ष अनिल कदम यांनी जिल्हाधिकारींकडे निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी परवानगी मागीतली आहे संस्थेत ८ संचालक निवडून येतात त्यांनाच सर्वाधिकार असतात अध्यक्षांना फक्त निवडणूक व वार्षीक मिटींगचे अधिकार घटनेत आहेत या ३ वर्षात सर्वच संचालकांनी मिळून मिसळून संस्थेच्या कामांचा व सत्तेचा वाटा हिस्सा घेतला विरोधात कोणीच नव्हते त्यामूळे सर्वच अळी मिळी गूप चिळीच्या भूमिकेत होते मात्र चार महिन्यांपूर्वी संचालक डॉ बि एस पाटील सत्तेतून बाहेर पडले संस्थेतील नोकरभरतीत झालेल्या गैरकारभारा बाबत सदस्य लोटन महारू चौधरी यांनी आवाज ऊठविला आहे संस्थेच्या विश्वस्त मंडळाची मुदत दिनाक एप्रिल २०२१ मध्ये पुर्ण झालेली आहे.त्यांची निवडणूक घ्यावी असा अर्ज त्यांनी केला होता त्यावर संचालक डॉ पाटील व ऊपाध्यक्ष सौ वसूंधरा लांडगे कमल कोचर व विश्वस्त माधूरी पाटील यांनी धर्मदाय ऊपआयूक्तांना लेखी खूलासा दिला आहे त्यात
नविन कार्यकाळ साठी संस्थेच्या नविन घटनेच्या नियमानुसार.न्यायालयाच्या अधिकारी अधिक्षक अगर या न्यायालयाच्या देखरेख खाली निवडणुक लवकरात लवकर घेण्यात यावी.
संस्थेचे किर्द, हिशोब जनरल पत्रके, संस्थेचे, कार्यकारी मंडळाचे इतिवृत्त व अजेंडा
बुक, संस्था संचलित सर्व शाळा, कनिष्ठ महाविदयालय, वरिष्ठ महाविदयालय,
समन्वय समितीचे इतिवृत्त, कनिष्ट महाविद्यालयाचे विनाअनुदानीत व अनुदानीत
चे हजेरी पुस्तक (मस्टर) व खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व शाळेचे शिक्षकेत्तर
कर्मचा-यांचे मस्टर असे मुळ कागदपत्र कोर्टाच्या कार्यालयात नविन कार्यकारी
मंडळाची निवड होई पर्यत व कारभार सुरु होई पर्यत जमा करुन ठेवण्यात यावे.
नबिन कार्यकारी मंळाचे निवडणुकी पर्यत व चार्ज घेई पर्यंत संबधीत संस्थाहीत
संबधीत सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक उपक्रम इ. व कर्मचा-यांचे नियुक्ती
बाबत अगर इतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येवु नये. अर्ज व त्यांतील मागण्या मंजुर करण्यात याव्यात, संस्थेचे व संस्था संचलित शाळा उदिष्ठाचे व्यवस्थापणा संबधी संबधीत निर्देश व्हावे असा खूलासा केला आहे त्यावर चौघांच्या स्वक्षऱ्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button