Mumbai

? दंगल राजकारणाची…ठरलं एकदाचं..! कन्या रोहिणीसह एकनाथ खडसे बांधणार हातावर ‘घड्याळ’..हा नसावा भ्रमाचा भोपळा…

प्रा जयश्री दाभाडे

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, अखेर आता मुहूर्त ठरला असून 22 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच त्यांची कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईतील प्रदेश कार्यालयात संपन्न होणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांनीही खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत सूचक विधान केले होते.

शरद पवार म्हणाले होते की, एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते तसेच राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसेंचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा हे त्यांनी पाहावं, असे पवार म्हणाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला असून फक्त खडसेंच्या निर्णयाची गरज होती. मात्र, आता त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button