Pandharpur

जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा स्पीकर सेट नगरसेवक विवेक परदेशी यांनी दिला भेट कमी श्रमात, कमी खर्चात, जास्तीत जास्त भागात जोमाने राबणार जनजागृती मोहीम:-नगरसेवक विवेक परदेशी

जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा स्पीकर सेट नगरसेवक विवेक परदेशी यांनी दिला भेट कमी श्रमात, कमी खर्चात, जास्तीत जास्त भागात जोमाने राबणार जनजागृती मोहीम:-नगरसेवक विवेक परदेशी
पंढरपूर : कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व आरोग्य विषयक जनजागृती साठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा स्पिकर दुसऱ्या वेळी नगरसेवक विवेक परदेशी यांनी खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांचे शुभ हस्ते , आरोग्य सभापती विक्रम शिरसट, यश नागेश भोसले, डॉ एकनाथ बोधले यांचे उपस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेस भेट दिला. डिसेंबर महीन्यामध्ये कोरोमुक्त पंढरपूर अभियानासाठी शपथ घेण्यात आली होती. सदर अभियानासाठी श्री परदेशी यांनी सहज हातातून नेता येणारा स्पिकर सेट भेट दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढते कोव्हीडचे रुग्ण व वाढते कंटेंनमेंट झोन पाहता आजुन जास्त जोमाने जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरी हिवताप अधिकारी श्री किरण मंजुळ यांनी अजून एक पोर्टेबल स्पिकर सेट ची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेवक विवेक परदेशी यांनी सदर स्पिकर सेट तातडीने उपलब्ध करुन दिला. या दुसऱ्या लाटेच्या प्रसंगी पंढरपूरातील दानशुर व्यक्ती विविध माध्यमातून समाज सेवा करत असल्याने समाधान वाटत असल्याचे श्री परदेशी यांनी सांगितले.
या स्पिकरच्या मदतीने कमी श्रमात, कमी खर्चात, जास्तीत जास्त भागात जनजागृती मोहीम राबवता येणार तसेच पंढरपूर शहरामध्ये आणी विशेषतः ज्या भागात रिक्षा जात नाही अशा गल्लीबोळा मध्ये अजुन जोमाने जनजागृती करता येईल. तसेच श्री परदेशी यांनी सर्व कर्मचारी यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम ३० औषधे दिली. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये संपुर्ण पंढरपूरात शहरात वरचेवर जनजागृती करण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती विक्रम शिरसट यांनी सांगितले तर युवानेते श्री प्रणव परिचारक यांनी स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल नगरसेवक विवेक परदेशी यांचे आभार मानले व लवकरात लवकर या कोरोनाच्या महामारी पासुन आपली सुटका व्हावी व आपले जनजीवन सुरळीत व्हावी अशी पांडुरंग चरणी प्राथना केली व सर्व नागरिकांना कोरोना संदर्भातील शासनाचे सुचना पाळण्या संदर्भात विनंती केली.या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,आरोग्य सभापती विक्रम शिरसट,अधिकारी किरण मंजुळ, यश नागेश भोसले, धर्मराज घोडके, सौदागर डोपे, पांडुरंग डोके, वैभव डोके, राहुल लिंगे, बापु डोपे, मिलींद येळे, प्रितम कुलकर्णी, आनंद कासट,विकी राउळ,आनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button