Amalner

ई-पीक पाहणी आणि पिक पेराला ऑनलाईन सर्व्हरचा खोळंबा..शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

ई-पीक पाहणी आणि पिक पेराला ऑनलाईन सर्व्हरचा खोळंबा..शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

अमळनेर येथील ऑनलाइन ई पिक पेरा प्रणाली मुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शासनाने 15 ऑगस्ट पासून सर्व शेतकर्‍यांना आपल्या शेतातील केलेल्या पीक लागवडीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी पोर्टल स्मार्टफोनवर उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचे प्रात्यक्षिक व जनजागृती महसूल प्रशासनाने देखील केली. मात्र बहुतेक शेतकर्‍यांकडे स्मार्टफोन नसणे, मोबाईल हाताळता न येणे, पोर्टल न उघडणे, मोबाईलला नेटवर्क नसणे, माहिती भरता न येणे इ समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सदर पोर्टल उघडत नसल्याचे शेतकर्‍यांची तक्रार आली आहे. तलाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत करीत आहेत.परंतु तरीदेखील अंत्यत कमी आणि मोजक्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने पीक पेरा नोंदणी आता पर्यंत केली आहे. ऑनलाईनच्या घोटाळ्याने अनेक शेतकरी पीक पेरा पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.या संदर्भात शासनाने शेतकर्‍यांच्या या समस्येवर मार्ग काढावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.अनेक ग्रामीण शेतकरी हे अशिक्षित आहेत त्यांना ह्या सर्व ऑनलाइन सुविधा हाताळणे शक्य होत नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. अमळनेर महसूल विभागाने यावर उपाय काढावा आणि शेतकऱ्यांचा हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना न्याय व दिलासा द्यावा अशी विनंती आणि मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button