Pune

वनगळी येथे ई-पीक पाहणी मार्गदर्शन कार्यशाळा इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद

वनगळी येथे ई-पीक पाहणी मार्गदर्शन कार्यशाळा
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद

दत्ता पारेकर पुणे

पुणे : वनगळी, इंदापूर एस. बी.पाटील पब्लिक स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ई-पीक पाहणी मोबाईलद्वारे कशी करावी, याविषयी इ.१०वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष कृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंदापूर शहराचे तलाठी सचिन करगळ आणि अकोला(भिगवण) येथील तलाठी महादेव भारती हे उपस्थित होते.या अधिकाऱ्यांनी मुलांना हे अँप मोबाईलवर कसे घ्यावे. तसेच ह्या अँपचा वापर करून अगदी शेतामध्ये बसूनदेखील प्रत्येक शेतकरी पीक नोंदणी तसेच इतर संबंधीत कामे जे की एक तलाठी करू शकतात, ते सगळे करू शकतात.भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकरी ह्याचा फायदेशीर उपयोग करू शकतो, अश्याप्रकारे खूप उपयुक्त महिती देऊन व ॲप मध्ये प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये ४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला तर ऑनलाईन १०४ असे एकूण १४९ विध्यार्थी व एकूण 24 शिक्षक सहभागी झाले होते.
उपस्थित अधिकाऱ्यांचे शाळेचे प्राचार्य शैलेश दरेकर यांनी स्वागत केले.तसेच विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कुमारी सुहानी शिंदे व सूरज माने यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यशाळा उत्साही वातावरणात पार पडली. पाहुण्यांचे आभारप्रदर्शन होऊन कार्यशाळेची सांगता झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button