Pandharpur

पंढरीत तरुणाईच्या सेवेत DVP लायब्ररी

पंढरीत तरुणाईच्या सेवेत DVP लायब्ररी

DVP लायब्ररीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपुरात आज DVP लायब्ररीचं पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री.विक्रमजी कदम साहेब, तहसीलदार श्री.सुशीलजी बेल्हेकर साहेब, संभाजी ब्रिगेडचे श्री. अमरजीतजी पाटील, मनसे नेते श्री.दिलीप बापू धोत्रे यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. अनेक तरूण-तरूणीं हे स्पर्धा परिक्षाकरिता पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर सारख्या ठिकाणी राहावं लागतं. तर काहीच्या खिशाला परवडणारी हि ठिकाणं नसतात. हिच बाब लक्षात घेऊन आपल्या डिव्हीपी स्केअर मध्ये लायब्ररी सुरू करण्यात आली आहे नक्कीच तालुक्यातील अनेक तरूण तरुणीं यातून याचा लाभ घेऊन कीर्तिवंत अधिकारी घडतील.
यामध्ये लायब्ररीत २४तास तरूणांना प्रवेश देण्यात येईल, श्री.कदम साहेब व श्री.बेल्हेकर साहेब, श्री.गुरवसाहेब यासारख्या प्रशासन अधिकाऱ्यांनी देखील महिन्यातून एकदा येऊन तरूणांना मार्गदर्शन करण्याचे अवाहन केले. लोकोपयोगी उपक्रमात नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यावेळी राजकीय, सामाजिक, तसेच सरपंच, तरूण मित्र, विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button